दुध ओतून देणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करा!!!

दुध ओतून देणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करा!!!

दुध ओतून देणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करा: लोकजनशक्ती पार्टीची मागणी

पुणे :दूध उत्पादकांना रास्त दर मिळाला पाहिजे या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाला लोकजनशक्ती पार्टीचा पाठिंबा आहे, मात्र कोरोना विषाणू महामारीच्या काळामध्ये शेतमाल ,अन्न आणि दूध मिळणे मुश्कील होत असताना रस्त्यावर दूध ओतून देणे चुकीचे असून, दूध ओतून देणाऱ्या आंदोलकांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे .

आज मुख्यमंत्र्यांना लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट आणि प्रदेश सचिव अण्णासाहेब कांबळे यांनी हे निवेदन पाठवले आहे.

  1. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दूध उत्पादकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने ते सोडवले पाहिजेत, मात्र अत्यंत कष्टाने उगवलेले धान्य , शेतमाल, दूध रस्त्यावर फेकून देण्याच्या कृतीला लोकजनशक्ती पार्टीचा पाठिंबा राहणार नाही ,असे या पत्रकात म्हटले आहे .आंदोलनाचे सनदशीर मार्ग उपलब्ध असताना आततायीपणाचा अवलंब आंदोलकांनी करू नये ,असे या आवाहनात म्हटले आहे.

Leave a Reply