‘द लिप यू नीड नाऊ -‘ग्लोबल लर्निंग फॉर फ्युचर लीडर्स’

‘द लिप यू नीड नाऊ -‘ग्लोबल लर्निंग फॉर फ्युचर लीडर्स’

भारती विद्यापीठ आय एम ई डी मध्ये ‘ग्लोबल लर्निंग ‘ विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार

पुणे :भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ मध्ये ‘द लिप यू नीड नाऊ -‘ग्लोबल लर्निंग फॉर फ्युचर लीडर्स ‘ विषयावर आंतरराष्ट्रीयवेबिनार आयोजित करण्यात आला होता .भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता आणि आय एम ई डी  चे संचालक  डॉ सचिन वेर्णेकर, डॉ. बर्नार्ड आयकोलेटी (टेम्पल युनिव्हर्सिटी ,रोम ),डॉ . सुभाष चंदर(कुवैत ),डॉ.सोनिया बिलोर (लिनस युनिव्हर्सिटी,स्वीडन ),डॉ शमसूल बाहरी (मलेशिया ),डॉ बलजित कौर,डॉ श्याम शुक्ला ,डॉ दीपक नवलगुंद सहभागी झाले . हा वेबिनार १७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पार पडला. विविध देशातून विद्यार्थी ,प्राध्यापक ,संशोधक ,मार्गदर्शक सहभागी झाले. युवा पिढीसाठी जागतिक पातळीवर उपलब्ध शैक्षणिक संधी ,आव्हाने यावर वेबिनारमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.  ‘आयएमईडी’ च्या  पौड रस्तायेथील कॅम्पस मध्ये हा वेबिनार झाला.

Leave a Reply