१५० पोलीस कर्मचाऱ्यांना आयुर्वेद, पंचगव्य व ओझोनाईज्ड औषधी चे वाटप

१५० पोलीस कर्मचाऱ्यांना आयुर्वेद, पंचगव्य व ओझोनाईज्ड औषधी चे वाटप

    1. १५० पोलीस कर्मचाऱ्यांना आयुर्वेद, पंचगव्य व ओझोनाईज्ड औषधी चे वाटप

पुणे, १६ जुलै: देशात पाच लॉकडाऊन नंतर आता पुणे शहर व जिल्हाच्या काही भागात १४ जुलै ते 23 जुलै पर्यंत सहावा लॉकडाऊन लावण्यात आला. आणि पुन्हा पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्गाची जबाबदारी वाढली. ही सर्व स्थिती पाहूता भा.ज.पा. कामगार आघाडी च्या सह-संयोजक व भा.ज.पा. चित्रपट कामगार आघाडी प्रदेश प्रभारी डॉ. प्रीती व्हिक्टर यांच्या तर्फे कामगार नेते व भा.ज.पा. संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष मा.संजय केनेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयुर्वेदतज्ञ,पंचगव्य थेरेपिस्ट डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेल्या Immunity Booster व Preventive असे परिणाम असणारे आयुर्वेद, पंचगव्य व ओझोनाईज्ड औषध कोंढवा पोलिस स्टेशन च्या १५० पोलीस कर्मचाऱ्यांना आज मोफत देण्यात आले.

यापूर्वी देखील डाॅ. प्रीती यांनी पोलिसांची वैद्यकीय तपासणी, गरजू लोकांना भोजन व अनेकानां अन्नधान्य वितरण असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवलेले आहेत व त्याचा फायदा लाखो लोकांना झाला आहे.
आजच्या या आयुर्वेद औषध वाटपाच्या उपक्रमा प्रसंगी कोंढवा पुलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गायकवाड सर, उपक्रमाच्या आयोजीका सौ.प्रीती व्हिक्टर, डॉ. दिलीप कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योगपती विवेक जोशी, डॉ.अपुर्वा सावंत व कोंढवा पुलिस स्टेशन हद्दीतील अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले हे औषध अत्यंत गुणवत्तापूर्ण व नागरिकांना उपयुक्त आहे. आजतागायत अनेक व्यक्तींनी याचा उपयोग केला असून उत्तम स्वस्थ ते जगत आहे. कोरोना ग्रस्त रुग्णाना ठीक करण्याची क्षमता या औषधीत आहे. सोबतच प्रत्येकाला कोरोना विषाणू संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी उपयोगी आहे.

Leave a Reply