तृतीयपंथी वर्गासाठी अनोखा दिवाळीउत्सव सोहळा

तृतीयपंथी वर्गासाठी अनोखा दिवाळीउत्सव सोहळा

पुणे: खरे तर आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे.. तरीसुद्धा समाजाने न स्वीकारलेला समाज म्हणजे तृतीयपंथी. त्यांनाही समाजाने स्वीकारावे याकरिता अभिनेत्री, निवेदिका, समाजसेविका मेघना झुझम आणि सुनंदा ढेरे यांनी आगळ्यावेगळ्या दिवाळी उत्सवाचे आयोजन केले होते. प्रथम त्यांना औक्षण करून फुलांनी स्वागत करण्यात आले, नंतर पाटावर बसवून त्यांना ओवाळून त्यांची ओटी भरण्यात आली, डोक्यामध्ये गजरे मांडण्यात आले.. त्यांच्यासाठी खास विठू माऊलीच्या मंदिरात हजारो दिवे लावण्यात आले आणि त्यांच्यासाठी सुंदर भजन कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला. विठू माऊलीच्या गजरामध्ये फुगड्या घालण्यात आल्या.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिस्टंसिंग चे पालन करीत हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक पृथ्वीराज दादा सुतार, आणि आर्य झुझम यांनी मदत केली.

Leave a Reply