स्मशानभूमीतील कर्मचारी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा
पुणे: १७ नोव्हेंबर २०२०: आपण मर्त्य मानवांचा शेवटचा थांबा म्हणजे स्मशान. पद, पैसा संपत्ती, प्रसिद्धी या सर्वांचा मोह गळून पाडण्यासाठी कधी मधी स्मशानात जाऊन यावे असे माझे काही बुद्धीमान, पण जमिनीवर पाय असलेले सुहृद सांगतात. माझेही तेच मत आहे.
दिवाळी निमित्त सर्वत्र शुभेच्छांची लगबग असताना, आज बोपोडी आणि औंध येथील स्मशानभूमीत सेवा बजावणाऱ्या कर्मचारी सहकाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अद्याप अशी दखल कुणी घेतली नसल्याचे सांगत त्यांनी आभार मानले पण त्यांचे काम तितकेच महत्त्वाचे असल्याचे मी मानतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे.
कोरोना संकट काळात या कर्मचारी सहकाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले आहे हे आपण कदापि विसरता कामा नये. कायमच आपल्या अशा समाज घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.