शिक्षकांनी रंगवली  ऑन लाईन दिवाळी पहाट !

शिक्षकांनी रंगवली  ऑन लाईन दिवाळी पहाट !

शिक्षकांनी रंगवली   ऑन लाईन दिवाळी पहाट !

भारतीय विद्या भवन-इन्फोसिस फाउंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे :भारतीय विद्या भवनच्या शाळातील शिक्षकांच्या गायनाने भारतीय विद्या भवन-इन्फोसिस फाउंडेशनची ‘ दिवाळी पहाट ‘ ऑन लाईन रंगली . ‘सांस्कृतिक प्रसार’ कार्यक्रमांतर्गत या संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार ,१३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता या  मैफलीचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब आणि फेसबुक वरून करण्यात आले . शास्त्रीय ,सुगम गायनापासून फिल्मी गीतांपर्यंत चा माहोल शिक्षक -शिक्षिकांनी उभा केला .भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले .मंजिरी शहाणे यांनी सूत्रसंचालन केले. भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक ,विद्यार्थी आणि पालकांनी मैफिलीचा आनंद ऑन लाईन लुटला. पसायदानाने मैफिलीची सांगता झाली.

Leave a Reply