पुण्यभूषण ची ‘पहाट  दिवाळी  ऑनलाईन साजरी

पुण्यभूषण ची ‘पहाट  दिवाळी  ऑनलाईन साजरी

पुण्यभूषण ची ‘पहाट  दिवाळी  ऑनलाईन साजरी

निवडक पहाट मैफिलींच्या स्मृतिगंधाने दरवळली पुणेकरांची पहाट !

पुणे : ‘त्रिदल -पुणे’ आणि ‘पुण्यभूषण फौंडेशन ‘ ची ‘पहाट  दिवाळी’ संगीत मैफल  यंदा ऑनलाईन साजरी झाली. त्यातून पुण्यभूषण च्या ३ दशकांच्या निवडक पहाट मैफिलींचा स्मृतिगंध पुणेकरांच्या भेटीला आला !

‘ दीपसूर तेजाळती’ असे या पहाट मैफिलीचे नाव होते. शनिवार ,१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता निवासी आणि अनिवासी पुणेकरांनी या मैफिलीचा आनंद लुटला.पंडित जसराज यांच्या अभिजात गायनापासून रोणू मुजुमदार-तौफिक कुरेशी यांच्या जुगलबंदीपर्यंत अनेक स्मृतिगंध या मैफिलीत दरवळले. ‘पुण्यभूषण फौंडेशन ‘चे संस्थापक डॉ सतीश देसाई यांनी ‘पहाट दिवाळी’ संकल्पनेच्या स्थापनेपासून उजाळा दिला.

रोटरी क्लब ३१३१ च्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी ,डॉ सतीश देसाई हे या पहाट दिवाळीचे आयोजक होते.मकरंद टिल्लू यांनी संयोजन सहकार्य केले . यू ट्यूब आणि फेसबुक लाइव द्वारे ही मैफल रसिकांच्या भेटीस आली.

‘१९९३ साली ‘त्रिदल ‘  संस्थेने प्रथम ‘दिवाळी पहाट ‘ मैफिलीच्या संकल्पनेला प्रारंभ केला आणि आता जवळपास प्रत्येक गल्लीत ,गावात ,परदेशात दिवाळी पहाट साजरी होते. या संकल्पनेमुळे दिवाळी अधिक रंगतदार होऊ लागली आणि नवनवीन प्रतिभांना व्यासपीठ मिळाले. यंदा कोविड साथीमुळे जाहीर मैफल शक्य नसली तरी ऑनलाईन माध्यमातून ही परंपरा सुरू ठेवली गेली’, असे डॉ. सतीश देसाई यांनी सांगीतले.

Leave a Reply