मराठी अभिनेत्री केतकी मल्याळम चित्रपटात
आजच्या ग्लोबल युगातील मराठी कलाकार एका भाषेतील चित्रपटात भूमिका साकारत असतानाच अन्यभाषिक चित्रपटात भूमिका साकारण्याचाही अनुभव घेतात. ‘गर्ल्स ‘ ( २०१९) या मराठी चित्रपटात भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलेल्या केतकी या अभिनेत्रीने ‘विरम ‘ या मल्याळम चित्रपटात भूमिका साकारली आहे. तिची भूमिका असलेले ‘बोधी ‘, ‘निर्मल इनरुट ‘, ‘रिस्पेक्ट ‘ असे काही मराठी चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाले आहेत. आजच्या मराठी कलाकारांचा हा अॅप्रोच विशेष कौतुकाचा आहे.