मराठी चित्रपट सृष्टीला लवकरच मिळणार इंडस्ट्रीचा दर्जा

मराठी चित्रपट सृष्टीला लवकरच मिळणार इंडस्ट्रीचा दर्जा

मराठी चित्रपट सृष्टीला लवकरच मिळणार इंडस्ट्रीचा दर्जा

म्हाडा मध्ये मराठी कलाकारांना मिळणार त्यांच्या हक्काचे घर ; राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाची मागणी

मुंबई:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने कलाकारांच्या अनेक प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा मिळावा,मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये कलाकारांसाठी कलाकार भवन उभं करावं,ज्येष्ठ कलाकारांचे मानधन ३ हजार आहे ते वाढवून १५ हजार रुपये महिना असे करावे,राज्यातील चित्रपट गृहांचा जो स्थानिक मालमत्ता कर आहे व लाईट बिल आहे यात ते कर माफ करावे किंवा त्याच्यामध्ये सूट द्यावी,तसेच सिडको आणि #म्हाडा येथे राखीव कोट्यातून कलाकारांना घरे मिळावी अशा मागण्या चा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.

मराठी चित्रपट सृष्टीला साधारण ७० ते ८० वर्ष झाली असून अनेक उत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती या इंडस्ट्रीने केली आहे, तसेच अनेक चित्रपटांनी केवळ प्रसिद्धी कीर्तीच नव्हे तर उत्तम व्यवसाय सुद्धा केला मराठी चित्रपट सृष्टी चा व्यवसायिक आवाका वाढतो आहे तरी अजून मराठी चित्रपट व्यवसायाला इंडस्ट्रीचा दर्जा न मिळाल्याने अनेक मराठी चित्रपट निर्माते अजूनही प्रायव्हेट फायनान्स वर अवलंबून आहेत त्यांना बँकेकडून कर्ज पुरवठा होत नाही प्रायव्हेट फायनान्स न परवडणार्‍या व्याजाने फायनान्स करतात त्याचा परिणाम मराठी इंडस्ट्रीच्या व्यवसायावर व त्या व्यावसायिकांवर होत असून जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या व मराठी इंडस्ट्रीच्या व्यवसायिक वृद्धीसाठी त्याचा उपयोग होईल असे मत राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील व राज्य समन्वयक संतोष साखरे तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर, यांनी यावेळी व्यक्त केले.

अनेक कलाकार,तंत्रज्ञ,लोक कलावंत चित्रपट सृष्टीत आपले योगदान देत आहेत ते केवळ मुंबई-पुण्यात राहत नसून कामानिमित्त त्यांना मुंबई-पुणे-नाशिक- कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते मुंबई, पुणे या ठिकाणी राहण्याची गैरसोय होत असल्यामुळे कलाकारांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते अशा कलाकारांसाठी साधारण आठ ते दहा दिवस राहण्याची सोय व्हावी म्हणून कलाकार भवन उभारणे गरजेचे आहे, तसेच सिनेमा गृहांचे स्थानिक मालमत्ता कर हे थेटर बंद असल्याने ते सगळे माफ करावे किंवा त्याच्यामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात यावी हा देखील प्रश्न उपस्थित केला गेला, असे मत राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे व ज्येष्ठ अभिनेत्री तथा प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर यांनी व्यक्त केले.

तसेच यासंदर्भात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची या सर्वांनी भेट घेऊन म्हाडा मध्ये कलाकारा कोट्यातून मराठी कलाकारांना आपले हक्काचे घर मिळावे यासंदर्भात त्यांना देखील निवेदन देण्यात आले, त्यांनी देखील कलाकारांच्या घरा विषयी असलेला प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असून तो मार्गी लागायला हवा असे मत व्यक्त करत त्याबाबत आपण सकारात्मक भूमिका घेऊन असे ते म्हणाले.

अजित पवारांनी या संबंधित मंत्र्यांशी आणि प्रमुख सचिवांशी ताबडतोप फोनद्वारे सविस्तर चर्चा केली व लवकरात लवकर कशा पद्धतीने या मागण्या पूर्ण करता येतील हे पाहू व लवकर आदेश काढू असे सांगितले.यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील,समन्वयक संतोष साखरे,प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर,प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर,पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे,व विद्याताई म्हात्रे उपस्थित होते.

Leave a Reply