इंडियन सिने फेस्टिव्हल मध्ये ‘मदर इंडिया’ला ‘बेस्ट ऍड फिल्म अवॉर्ड

इंडियन सिने फेस्टिव्हल मध्ये ‘मदर इंडिया’ला ‘बेस्ट ऍड फिल्म अवॉर्ड

इंडियन सिने फेस्टिव्हल मध्ये ‘मदर इंडिया’ला ‘बेस्ट ऍड फिल्म अवॉर्ड ‘

योगेश देशपांडे यांच्या ‘रिडिफाइन कन्सेप्ट्स’चे यश

पुणे : इंडियन सिने फेस्टिव्हल २०२० मध्ये पुण्याच्या ‘रिडिफाइन कन्सेप्ट्स’ निर्मित ‘मदर इंडिया’ या जाहिरातपटाला (ऍड फिल्म) ‘बेस्ट ऍड फिल्म अवॉर्ड’  मिळाले आहे.’रिडिफाइन कन्सेप्ट्स’ संस्थेचे संचालक,लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

देशाच्या रक्षणाची आणि आपल्या कुटुंबातील महत्वाच्या क्षणांतील आनंदात सहभागी होण्याची कर्तव्यदक्षता बाळगणाऱ्या महिला,मातांना या जाहिरातपटामध्ये  अभिमानाचा सलाम करण्यात आलेला आहे.

पीएनजी ज्वेलर्स साठी तयार केलेल्या या जाहिरातपटामध्ये लेखन,दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केले असून वर्षा घाटपांडे,नुपूर दैठणकर या कलाकारांनी त्यात अभिनय केला आहे.

‘मिनी बॉक्स ऑर्गनायझेशन’ आयोजित फेस्टिव्हलचे हे आठवे वर्ष होते.६० देशातून ४६० प्रवेशिका आल्या होत्या.त्यातून ही निवड करण्यात आली.दर वर्षी मुंबईत होणारा फेस्टिव्हलचा पारितोषिक वितरण सोहळा यावर्षी कोविड विषाणू साथीमुळे ऑनलाईन आयोजित करण्यात आला.

‘कोविड विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कठीण परिस्थितीत सर्व दक्षता बाळगून ही फिल्म तयार करण्यात आली.त्यामुळे या यशाला अधिक महत्व आणि आनंद आहे’,असे योगेश देशपांडे यांनी सांगितले.

Leave a Reply