राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पुन्हा एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यास न्याय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पुन्हा एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यास न्याय

बाबासाहेब पाटील यांची राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे कार्य करत असते गेली अनेक वर्ष पार्टी सोबत कार्य करत असलेला कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले बाबासाहेब पाटील प्रथम पुणे शहर अध्यक्ष या पदावर होते त्यानंतर त्यांचे कार्य पाहता सुप्रिया सुळे यांनी त्यांची कार्याध्यक्षपदी निवड केली व त्यांना पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड प्रदेश अध्यक्ष पदी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष नसून एक विचार आहे आदरणीय पवार साहेब यांच्या कडून प्रेरणा घेऊन मी गेली अनेक वर्ष पक्षासोबत काम करत होतो वेळोवेळी पक्षाने मला खूप काही दिले माझं सामाजिक अस्तित्व निर्माण करण्यात ही पक्षाचा खूप मोठा वाटा आहे. पवार साहेबांचे,सुप्रियाताईं अजित दादा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते आणि ही मोठी जबाबदारी आता माझ्यावर पक्षाने दिले आहे याला योग्य प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न मी करेन असे मत बाबासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

बाबासाहेब पाटील यांनी यापूर्वी पुणे महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर,पुणे महानगरपालिकेच्या कमिटीवर,महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याच्या समितीवर काम केलेले आहे,तसेच चार वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पर्यावरण विभागात देखील त्यांनी काम केलेले आहे तसेच चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे पुणे शहर अध्यक्ष म्हणून दोन वर्ष कामकाज पाहिलेले आहे.

Leave a Reply