पुण्यातील दहा हजारहून अधिक माता भगिनींना दिवाळी भेट देण्यात

पुण्यातील दहा हजारहून अधिक माता भगिनींना दिवाळी भेट देण्यात

पुणे: कोरोना महामारीचे संकट अजून राज्यात असतांना काही दिवसांवर येऊन पोहोचला दिवाळीचा सण नागरिकांना उत्साहात साजरा करता यावा यासाठी ऑल इंडिया अँटिकरप्शन बोर्ड चे प्रदेश अध्यक्ष सन्नी निम्हण व श्रीमती स्नेहल सन्नी निम्हण या दाम्पत्याच्या वतीने पुण्यातील दहा हजारहून अधिक माता भगिनींना दिवाळी भेट देण्यात आली. या मध्ये दिवाळी उपयोगी माता लक्ष्मीचा फोटो, पूजनासाठी लक्ष्मीचे चरण पादुका, आकर्षक दिवे, वाती, अभ्यंगस्नाना साठी उटणे आदी वस्तूंचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.

या उपक्रमाप्रसंगी आयोजक सनी निम्हण, सौ. स्नेहल सनी निम्हण, रंजना रजपूत, आशा हडावले, सीता रजपूत, विठाबाई निम्हण, विठ्ठल रजपूत, शिवम पायगुडे, अजित गजमल, महेश भूवड, आशिष चव्हाण, अमित शिंदे, योगेश होडे, तसेच एकता मित्र मंडळ व श्रीराम मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply