पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड रूग्णालयाला मेडिकल कीटचे वाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड रूग्णालयाला मेडिकल कीटचे वाटप

पुणे, दि.17 सप्टेंबर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाला मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येकी 500 एन95 मास्क, सॅनिटायझर व पीपीई कीट आहेत. माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते या मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर व इतर संलग्न वैद्यकीय कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. कोरोनाच्या लढाईत त्यांचे आरोग्यदेखील अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांची सुरक्षा व्हावी म्हणून त्यांना एन95 मास्क, पीपीई कीट व सॅनिटायझर देण्यात आले आहे. याप्रसंगी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंग, बॉम्बे सपायर्सचे कमांडिंग ऑफिसर अनिरुद्ध सूर्यवंशी, पीएमपीएमएल चे संचालक शंकर पवार, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक दुर्योधन भापकर, अभय सावंत, मनीष आनंद, कमलेश चासकर, कार्तिकी हिवरकर, पुणे महापालिकेचे नगरसेवक राहुल भंडारी, भाजपा माथाडी कामगार संघटनेचे तुषार पाटील,अनंत खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक राहुल भंडारी यांच्या वतीने मान्यवरांना माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते भगवत गीता भेट देण्यात आली.

Leave a Reply