“माझी वसुंधरा” या पर्यावरणपूरक अभियान

“माझी वसुंधरा” या पर्यावरणपूरक अभियान

आज महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून “माझी वसुंधरा” या पर्यावरणपूरक अभियानाचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , राज्यमंत्री संजय बनसोडे जी यांच्या उपस्थितीत शुभारंभ केला. वातावरण बदल संकटापासून आपल्याला वाचायचे असेल तर आपल्याला पर्यावरणाचे संवर्धन करावे लागेल!पर्यावरणाचे संरक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल.

यावेळी मी “माझी वसुंधरा” या मोहीमेचे महत्व विभागाच्या वतीने सर्वांना सांगितले. आपली जीवनशैली सुधारण्याच्या हेतूने ही स्पर्धा राबविण्यात यावी असे आवाहन मी यावेळी सर्व उपस्थितांना केले. या स्पर्धेमध्ये प्रत्येक घटकासाठी पॉइंट्स आणि गुण असतील.

यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर जी, MPCB चे चेअरमन श्रीवास्तव जी, MPCB चे सचिव शिनगारे जी, वनविभाग प्रधान सचिव म्हैसकर जी, महसूल विभाग प्रधान सचिव करिर जी, ग्रामविकास अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार जी व सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, CEOs उपस्थित होते.

Leave a Reply