मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने १५० कुष्ठरोगी कुटुंबाला धान्याचे वाटप.

मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने १५० कुष्ठरोगी कुटुंबाला धान्याचे वाटप.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारातून येवलेवाडी ता.हवेली येथील १५० कुष्ठरोगी कुटुंबाला धान्याचे वाटप.

पुणे दि.२६ : महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दि.२६ जुलै, २०२० रोजी शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार आणि पुढाकारातून येवलेवाडी, पिसोळी ता.हवेली येथील वन विभागाच्या वसाहतीत राहणाऱ्या कुष्ठरोगी १५० कुटुंबांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे वाटप व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आ.डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या कुटुंबाने उद्धवजी ठाकरे यांना भरभरून आशीर्वाद दिले. याच ठिकाणी पुढील आठवड्यात दुसऱ्या टप्प्यात आणखी काही कुटुंबाना मदत केली जाणार आहे असे आ.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. या धान्याच्या किटचे नियोजन पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, महिला संपर्क संघटिका स्वाती ढमाले सरपंच मच्छिंद्र दांगट यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी संपर्क संघटिका रेखा कोंडे, प्रवीण डेव्हिड, उपशहरप्रमुख निलेश गिरमे हे यावेळी उपस्थित होते.

मागील २१ ते २२ वर्ष झाली मा.श्री उद्धवजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनात उत्कंठा घेऊन जात असत पण या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाणे शक्य नसल्याने साहेबांच्या आदेशानुसार आहे त्याच ठिकाणी समाज उपयोगी काम करत असल्याचे आ.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

Leave a Reply