कोपर्डी येथील अल्पवयीन पीडित मयत मुलीला न्याय मिळणेबाबत न्यायालयात प्रखरपणे मत मांडण्यात यावी आ.डॉ. गोऱ्हे

कोपर्डी येथील अल्पवयीन पीडित मयत मुलीला न्याय मिळणेबाबत न्यायालयात प्रखरपणे मत मांडण्यात यावी आ.डॉ. गोऱ्हे

 

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन पीडित मयत मुलीला न्याय मिळणेबाबत न्यायालयात प्रखरपणे मत मांडण्यात यावी आ.डॉ.नीलम गोऱ्हे‍ यांची गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांच्याकडे मागणी…

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १५ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मुलगीवर बलात्कार करून खून केला गेला. या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातून विविध संस्थांनी, संघटनांनी, सामान्य लोकांनी आणि विविध पक्षीय लोकांनी व्यक्त केला. या केस चे काम सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी पहिले. या केस मध्ये नोव्हेंबर २०१७ रोजी निकाल लागला. आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर येथे फाशीची शिक्षा सुनावली गेली. मात्र अद्याप पर्यंत या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही.

सदरील केस ही औरंगाबाद खंडपीठातुन मुंबई खंडपीठात वर्ग करण्यात आली असून तेथील स्टॅम्प नंबर CONFST/7/2019 असून सरकारी वकील श्री उमेशचंद्र यादव हे केस पाहत आहेत. तरी सरकारने या प्रकरणात लक्ष घालून, शीघ्रतेने आरोपींना शिक्षा देऊन पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या तथा विधानपरिषद माजी उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

तसेच गृहमंत्री ना.देशमुख यांना दिलेल्या निवेदनात आ.डॉ.गोऱ्हे यांनी खालील मागण्या केले आहेत.
◆ या घटनेची सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन आरोपींच्या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ होण्यासाठी न्यायालयात बाजू मांडण्याची सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात यावी.
◆ सदरील घटनेमध्ये कोव्हिडं-१९ मुळे तारखा मिळण्यास समस्या निर्माण होत असल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तारखा घेण्याची विनंती न्यायालयाला करण्यात यावी.
◆ अहमदनगर न्यायालयात निकाल झटपट लावण्यात यश आले परंतु औरंगाबाद खंडपीठात झटपट निकालासाठी लवकरात लवकर तारखा देण्यासाठी सरकारी वकिलाच्या मदतीने विनंती करण्यात यावी.‎

Leave a Reply