ओडिशाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली महाराष्ट्रीय संस्कृती

ओडिशाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली महाराष्ट्रीय संस्कृती

ओडिशाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली महाराष्ट्रीय संस्कृती

‘रायसोनी’, ‘एआयसीटीई’ यांच्यातर्फे लाईव्ह वेबिनार

पुणे : महाराष्ट्रातील लोकसंस्कृती, विविध लोककला, क्रीडाप्रकार, भौगोलिक आणि ऐतिहासिक ठिकाणे, वारसास्थळे आदींविषयी ओडिशातील विद्यार्थ्यांनी जाणून घेत महाराष्ट्रीय संस्कृती आणि परंपरा अनुभवली.

वाघोली येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (जीएचआरसीईएम) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ओडिशा आणि महाराष्ट्र यांच्यातील देवाणघेवाण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

‘रायसोनी’चे विश्वस्त संचालक अजित टाटीया, कार्यकारी संचालक डॉ. बिहाडे, ‘जीएचआरसीईएम’चे संचालक डॉ. एस. एन. माळी,
भुवनेश्वर (ओडिशा) येथील आर्यन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. सरतकुमार मिश्रा, नोडल अधिकारी अमेयकुमार साहू यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी आणि दोन्ही राज्यातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपसंचालक डॉ. वैभव हेंद्रे यांनी महाराष्ट्र संस्कृती, अधिष्ठाता डॉ. डी. एम. यादव यांनी क्रीडाप्रकार, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संतोषकुमार मिश्रा यांनी भौगोलिक व सांस्कृतिक माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी रमेश पाटोळे यांनी आभार मानले.

Leave a Reply