पुणे:
हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या ८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे कला दालन सारसबाग येथे त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषद उपसभापती आ.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन माजी गटनेते अशोक हरणावळ,नागसेवक बाळा ओसवाल यांनी केले. या प्रसंगी राजेंद्र शिंदे,चन्दन साळुंखे किशोर रजपूत,नागेश खडके,सुलभा तळेकर,श्रुती नझिरकर,परेश खांडके,हनुमंत दगडे,जुबेर तांबोळी,मुकुंद चव्हाण,दत्ता देशमुख,बाळासाहेब मेमाणे,श्रवण झगडे,विशाल कोंढरे.आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ.गो-हे यांनी “बाळासाहेबांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशी शिकवण दिली.कोरोना काळात शिवसेनेने १०० टक्के समाजसेवा केली आहे.नुकतीची पाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंदिरे खुली करण्यात आली आहेत.मात्र कोरोना गेलेला नसल्याने सरकारने दिलेल्या निर्देशांचे नागरिकानी पालन करावे असे आवाहन डॉ.गो-हे यांनी केले.
