डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीच्या विट…

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीच्या विट…

अयोध्यातील राममंदिराच्या पुनर्बांधणीतील पायाशी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व शिवसेना कुटुंबाकडून एक किलो चांदीच्या विट.

मुंबई/पुणे दि.१२ : अयोध्यातील राम मंदिराची पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. यासाठी अगोदरच शिवसेना पक्षाच्या वतीने मदत करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या राम मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान एक किलो चांदीची विट शिवसेना आणि गोऱ्हे कुटुंबीय यांच्या वतीने देण्याचा इच्छा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रगट केली होती. ही चांदीची विट राम मंदिराचे ट्रस्टी यांच्याकडे दि.१६ नोव्हेंबर, २०२० बालप्रतिपदाच्या शुभ दिवशी सुपुर्द करण्यात येणार आहे. आज दि. १२ नोव्हेंबर, २०२० रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते या विटेचे पूजन मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी करण्यात आले. या चांदीच्या विटेवर पुढीलप्रमाणे मचकूर आहे.

|| श्री गणेशाय नम: ||

हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नानुसार अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने व सौ.रश्मी, ना.आदित्य,श्री.तेजस ठाकरे* यांच्या सहकार्याने प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी एक खारीचा वाटा अर्पण करीत आहे.

श्रद्धापूर्वक वंदन .ना.डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती, महाराष्ट्र राज्य

कै.दिवाकर व लतिकाताई गोर्हे परिवार, जेहलम जोशी दि. १६ नोव्हेंबर, २०. बलीप्रतीपदा शके

Leave a Reply