पुणे पदवीधर मतदारसंघवर महाविकास आघाडीचाच झंडा फडकणार- सवाणे.

पुणे पदवीधर मतदारसंघवर महाविकास आघाडीचाच झंडा फडकणार- सवाणे.

पुणे:  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अरुण लाड यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

पुणे शहरात पदवीधर मतदारांची संख्या सर्वाधिक असून त्याच्या पर्यंत योग्य उमेदवाराची माहिती व काम पोहचवण्यासाठी काय योजना आखण्यात आल्या पाहिजे? पदवीधर मतदारांवर होत असलेला अन्यायाला राष्ट्रवादीचे उमेदवार कशे न्याय मिळवून देतील? नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अटी बंध राहतील आदी अनेक मुद्दे पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या अनुशंगाने अशे हाताळले जावेत यावर सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

बैठकी प्रसंगी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद सवाणे म्हणाले की, या वेळी पुणे पदवीधर मतदारसंघवर महाविकास आघाडीचाच झंडा फडकणार व त्यासाठी आ.पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे व सर्व जेष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार काम केले जाणार आहे.

Leave a Reply