पुणे विभागातील 15 हजार 95 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे विभागातील 15 हजार 95 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 25 हजार 127 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे:- पुणे विभागातील 15 हजार 95 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 25 हजार 127 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 9 हजार 19 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 487 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 20 हजार 577 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 11 हजार 942 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 937 आहे. कोरोनाबाधित एकूण 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 356 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.04 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.39 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 157 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 990, सातारा जिल्ह्यात 57, सोलापूर जिल्ह्यात 84, सांगली जिल्ह्यात 09 तर कोल्हापूर जिल्ह्यात 17 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 974 रुग्ण असून 711 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 221 आहे. कोरोनाबाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 2 हजार 434 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 515 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 666 आहे. कोरोना बाधित एकूण 253 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 328 रुग्ण असून 214 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 104 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 814 कोरोना बाधीत रुग्ण असून 713 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 91 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 67 हजार 400 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 64 हजार 561 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 39 हजार 106 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 25 हजार 127 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 28 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply