भारती विद्यापीठ आयएमईडी च्या २५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्लेसमेंट चे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

भारती विद्यापीठ आयएमईडी च्या २५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्लेसमेंट चे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

भारती विद्यापीठ आयएमईडी च्या २५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्लेसमेंट चे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

पुणे:भारती अभिमत विदयापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ  मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट'(आयएमईडी) च्या २५५  विद्यार्थ्यांना भारतातील नावाजलेल्या कंपन्यांमध्ये विविध पदांवर प्लेसमेंटस मिळाल्या आहेत.प्लेसमेंट चे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

भारती अभिमत विद्यापीठाचे व्यवस्थापन शास्त्र विभागाचे अधिष्ठाता आणि आयएमईडी चे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर  यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. कार्पोरेट रिसोर्स सेल या स्वतंत्र विभागामार्फत प्लेसमेंटससाठी आयोजित प्लेसमेंट ड्राइव्ह सारख्या उपक्रमाला १५० हुन अधिक कंपन्यांनी प्रतिसाद दिला. टेक महिंद्रा,विप्रो,आदित्य बिर्ला,टाटा अशा नामवंत कंपन्यांचा त्यात समावेश आहे.आयएमईडी मध्ये उदयोगक्षेत्राकडून विद्यार्थ्यांबद्दल असणाऱ्या  अपेक्षा,कुशल मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत वेगवेगळे मार्गदर्शन घेतले जाते.

संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.दिपक नवलगुंद,डॉ.श्याम शुक्ला यांनी प्लेसमेंट सेलचे काम पाहिले. विशेष प्रशिक्षण,व्यवसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण,समुपदेशन असे उपक्रम आयोजित करण्यात आले.स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम मधून  ६ विदयार्थी अर्जेन्टिना ,लिथुवानिया व २ विद्यार्थी युगांडा येथे  शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत गेले आहेत.

कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे,कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनामुळे  ही मजल मारणे शक्य झाले,असे डॉ.सचिन वेर्णेकर यांनी सांगितले.

Leave a Reply