पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांना कोव्हिड – १९ ची स्वाॕब टेस्ट बंधनकारक करा – संभाजी ब्रिगेड

पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांना कोव्हिड – १९ ची स्वाॕब टेस्ट बंधनकारक करा – संभाजी ब्रिगेड

पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांना कोव्हिड – १९ ची स्वाॕब टेस्ट बंधनकारक करा – संभाजी ब्रिगेड

पुणे शहरासह जिल्हा व राज्यामध्ये covid-19 अर्थात कोरोनाचे संकट भयानक वाढत चालले आहे. पुणे शहर व जिल्हा १००% टक्के रेड झोन मध्ये आहे. सर्व सामान्य नागरिकांचे संकटाच्याकाळात छोटे व मोठे उद्योग व्यवसायिक प्रचंड अडचणीत आहेत. कोरोणाच्या संकटात १०० टक्के हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना लाॕकडाऊन मुळे जगणे अशक्य झाले आहेत. त्यात उपासमारीच्या काळात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतात आणि बाधित व्यापाऱ्यांकडून घरबसल्या रुग्ण संकट वाढत आहे. कोण चांगले कोण वाईट कळायला मार्ग नाही. पुण्यातील सोसायट्यांना नियम लावताना व्यापाऱ्यांना सुद्धा तेच नियम लावले पाहिजेत पुण्यासह महाराष्ट्रात पुरणाच्या अस्मानी संकटात असताना पुणे महानगरपालिका 100% अपयशी पडत आहे. ‘दररोज हजारो रुग्णांचा वाढता आकडा हा पुणे प्रशासन निष्क्रिय असण्याचा पुरावा आहे.’ कारण एकाच जागेवर पाच- दहा वर्ष नेत्यांच्या मर्जीने कर्मचारी खुर्चीवर बसल्याने हे लोक प्रामाणिकपणे काम करत नाही. म्हणून त्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत. पुण्याला कोरोना महामारी त्या संकटातून वाचविण्यासाठी जे नियम नागरिकांना तेच नियम व्यापाऱ्यांना सुद्धा असले पाहिजे. म्हणून पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांना covid-19 स्वॕब टेस्ट बंधनकारक (अनिवार्य) करावी. त्याशिवाय व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देऊ नये… अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

पुण्यात काॕरनटाइन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत. सिंहगड रोड परिसरातील काॕरनटाइन सेंटरमध्ये रुग्ण महिले सोबत अत्यंत भयानक अनुचित प्रकार घडलेला आहे. ही रुग्ण महिला सध्या भयभीत आहे. ती अनुभव कथन करू शकते, मात्र वार्डमधील एकटी महिला पाहून मध्यरात्री बाराच्या पुढे सतत जोरात दरवाजा वाजून तिला उठवणे हा प्रत्यक्ष घडलेला प्रकार भयानक आहे. त्यावेळी १०० नंबर वर पोलीसांना तक्रार करून सुद्धा त्या वेळी कोणीही तक्रार घेतली नाही. अत्याचार करणारा स्टाफ मेंबर अजूनही महिलेला मोबाईल स्टेटस द्वारे फाॕलो करत आहे. हा प्रकार अत्यंत भयानक व गंभीर असून महिलेच्या सुरक्षेसाठी चिंताजनक आहे. अशा कर्मचाऱ्याला कठोर शासन झाले पाहिजे. यासाठी महापालिका आयुक्त यांनी विशेष लक्ष घालून, तपास करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

सदर मागणीचे पत्र मनपा आयुक्त, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांना पाठवले आहे.

Leave a Reply