पुणे मनपा भाजप सत्ताधारी कोरोना बाबतीत अपयशी- सौ दिपाली धुमाळ.

पुणे मनपा भाजप सत्ताधारी कोरोना बाबतीत अपयशी- सौ दिपाली धुमाळ.

राष्ट्रवादी चे नगरसेवक पूणे मनपाला सव्वा दोन कोटीचे ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देणार सौ दिपाली धुमाळ.

पुुणे: २६ जुुलै: पुणे शहरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जवळपास पन्नास हजारांच्या घरात रूग्ण आढळले आहेत. त्यामानाने प्रशासनाकडे नियोजना अभावी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध नाही. यातच अनेक रूग्णांना व्हेंटीलेटर व ऑक्सिजन बेड्स अभावी योग्य उपचार न मिळाल्याने आपले जिव गमवावे लागले आहे. यामध्ये अनेक अनेक सर्व सामान्य नागरिकां बरोबरच अनेक नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. याचीच जाणीव ठेऊन राष्ट्रवादी च्या नगरसेवकानी आपल्या पुणे मनपा च्या आपल्या स यादीतील विकासनिधीतुन प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी प्रशासनाला ऑक्सिजन बेड्स खरेदी करण्यासाठी सव्वादोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. खर हे नियोजन या अगोदरच करणे आवश्यक होते. परंतु सत्ताधारी व प्रशासन यांच्यातील नियोजना अभावी ना हक सर्वसामान्य पुणेकर नागरिकांचे बळी जात आहे. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने दिल्लीतुन एक तज्ञांचे पथक पुण्यात कोरोना विषाणू ची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठविले होते या पथकाने पुर्ण अभ्यास करून एक निष्कर्ष काढला होता की जूलै भहिना अखेर पुणे शहरात जवळपास पन्नास हजार रूग्ण संख्या होईल अशा प्रकारची माहिती देऊन सुध्दा सत्ताधारी यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही व प्रशासनाला योग्य ते उपाययोजना करण्यासाठी आदेश दिले नाही. केंद्रीय पथकाच्या सुचनेनुसार त्याचवेळी सत्ताधारी पदाधिकारी यांनी पुढील खबरदारी म्हणून आवश्यक दवाखाने, बेड्स; व्हेंटीलेटर; ऑक्सिजन बेड्स, टेक्निशन, डाॅक्टर, नर्स, लॅब टेक्निशन व असिस्टंट, व इतर कर्मचारी यांची पुर्तता करून ठेवणे आवश्यक होते. परंतु एकीकडे 67/3 च्या नावाखाली भरमसाठ खरेदी करण्याकडेच यांनी जास्त लक्ष दिले आहे. वास्तविक या पाहणी पथकाच्या सुचनेकडे पुर्ण पणे दुर्लक्ष केल्या मुळेच आज ही वेळ आली आहे आणी या गंभीर परिस्थितीला भाजपचे सत्ताधारी जबाबदार आहेत. हजारो रुग्णांची हेळसांड होत आहे अनेकांना दवाखान्यात बेड्स उपलब्ध होत नाही काहींना व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाही काहींना ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नाही त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना जिव गमवावा लागला आहे. म्हणूनच राष्ट्रवादी च्या सर्व नगरसेवकांनी आपल्या विकासनिधीतुन प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी प्रशासनाला ऑक्सिजन बेड्स खरेदी करण्यासाठी सव्वादोन कोटी रूपये प्रशासनाला उपलब्ध करून देत आहे. राष्ट्रवादी चे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा श्री अजितदादा पवार यांनी सर्व नगरसेवकांना व पक्षाच्या प्रत्येक सेलच्या पदाधिकारी यांना सुचना दिल्या आहेत की सर्वांनी आपापल्या भागात कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणुन रस्त्यावर उतरून आवश्यक त्या उपाययोजना व उपक्रम राबविण्यासाठी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक नगरसेवक व पदाधिकारी मनपाच्या प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत. परंतु याउलट सत्ताधारी चे नेते मात्र राजकारण करून आरोप व टिका करत आहेत त्याना याची जाणिव नाहीं की पुणे शहरात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे हे सत्ताधारी कोरोना विषाणू च्या महामारीचे संकट आटोक्यात आणण्यात अपयशी ठरले आहेत. यांचा प्रशासनावर अंकुश नाही. हे फक्त कोरोना च्या नावाखाली भरमसाठ खरेदी करण्यात व्यस्त आहेत. परंतु त्याना हे माहित नाही की पुणेकर त्यांना प्रत्येक पैशाचा जाब विचारल्याशिवाय रहाणार नाही. ही वेळ राजकारण व आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ नाही सत्ताधारी व विरोधी पक्ष व प्रशासन एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे परंतु येथे मात्र सत्ताधारी विरोधी पक्षांना कुठेही विचारात न घेता एक हाती सत्तेच्या जोरावर वाटेल तसे निर्णय घेत आहेत. त्यामुळेच आज ही गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्यात हे सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. पालकमंत्री आठवड्यातून किमान दोन दिवस पुण्यात मुक्काम ठोकुन ही गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना व प्रयत्न करीत आहेत राज्य शासनाकडून तसेच स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जे जे आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे त्याची पुर्तता करीत आहेत. आवश्यक अधिकारी वर्ग; यंत्रसामुग्री, मुबलक निधी उपलब्ध करून देत आहेत. तज्ञ डाॅक्टर व अनुभवी अधिकारी व प्रशासन व मनपा पदाधिकारी यांच्या समवेत वेळोवेळी बैठका घेत आहेत. व या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रवादीचा आमदार,नगरसेवक व सेल पदाधिकारी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याकामी पुर्ण पणे झोकून काम करीत आहे. खासदार वंदनाताई चव्हाण व शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखालील व मनपातील ज्येष्ठ नगरसेवक आजी माजी पदाधिकारी पुणे शहरात सर्वजण एकजुटीन या संकटातुन बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply