पुणे आणि पिंपरी चिंचवड उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती रोज मिळणार.

पुणे आणि पिंपरी चिंचवड उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती रोज मिळणार.

पुणे आणि पिंपरी चिंचवड,पुणें ग्रामीण येथे उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती रोज मिळणार.‏ आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेला पुणे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांचा सकारात्मक प्रतिसाद.

दि.०६ जुलै : कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. दि.२६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यानंतर या संदर्भात काय उपाययोजना केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे समन्वय ठेवता येईल हे पाहण्यासाठी एक व्हाट्सअप वरती ग्रुप तयार करण्यात आला होता. त्यावर रुग्णवाहिका आणि हॉस्पिटल मिळण्यासाठी वेळ लागत असल्याबाबत खा .वंदना चव्हाण यांनी माहिती टाकली होती. यानंतर आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली.
*पुणे शहरात कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेडस उपलब्ध आहेत याचा चार्ट पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी टाकला होता. तो अतिशय उपयुक्त असल्याचे शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. बेड कोणत्या हॉस्पिटल उपलब्ध आहेत हे पाहण्यासाठी वेळ जातो त्यामुळे बेड कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती दररोज पुणे,पिंपरी चिंचवड ,पुणें ग्रामीण अशी तिन्ही भागातही मिळाली तर हॉस्पिटलमध्ये बेड शोधण्यात जो वेळ लागेल तो त्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी उपयोग येईल.त्यामुळं बेड रोज उपलब्ध करून त्याची माहिती हेल्पलाईन च्या माध्यमातून देत येईल*अशी सूचना आ.डॉ.गोऱ्हे यांनी मांडली .
खा.सुप्रिया सुळे तसेच यासंदर्भामध्ये बऱ्याच सर्व उपस्थित सदस्यांनी मान्यवरांनी रुग्णांना सोयी त्वरित मिळण्यावर भर दिला. याबद्दल डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी ताबडतोब दखल घेतली असून रोज चारच्या सुमाराला यांच्याबद्दलचा संपूर्ण तक्ता दिला जाईल असे सांगितले.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेटी किंवा बैठक होणे थोडे अवघड असल्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन बैठक घेण्यात यावी सूचना आ.डॉ.गोऱ्हे यांनी मांडली याची दखल देखील विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी घेतली असून पुढील बैठका ऑनलाईन घेण्यात येईल असे आश्वासन दिले. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वच लोकप्रतिनिधी यांनी चिंता व्यक्त केली याबाबत डॉ.म्हैसेकर यांनी टेस्टिंगची संख्या वाढल्याने हा आकडा वाढत असल्याचे स्पष्टीकरण दिले.
अशा मिटिंग किंवा माहिती मिळत गेली तर आम्हालाही ज्याप्रमाणे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख मा.ना उद्धवजी ठाकरे हे सातत्याने पाठपुरावा करता आहेत ,त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुण्यात ही अनेक सुधारणा करता येईल असे आ.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

Leave a Reply