येत्या 7 जुलै पासून वीज उद्योगात राज्यव्यापी काम बंद

येत्या 7 जुलै पासून वीज उद्योगात राज्यव्यापी काम बंद

येत्या 7 जुलै पासून वीज उद्योगात राज्यव्यापी काम बंद आंदोलन करणार -महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा चा इशारा

पुणे- 1 जुलै – महावितरण कंपनी मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे,महावितरण , महापारेषण आणि महानिर्मिती या कंपनीतील कंत्राटी कामगारांसाठी महाराष्ट्र शासन ,ऊर्जा मंत्री आणि प्रशासन याना महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघ यांनी 8 जून ला नोटीस दिली होती याला उत्तर ना देता भरती प्रकिया शासनाने राबवली.

याच्या निषेधार्थ आज पुण्यातील सेनापती बापट रोड येथिल प्रकाश भवन या कार्यालयासमोर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ च्या वतीने कंत्राटी कामगारांनी टाळ वाजवून शासन आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करून आंदोलन केले.

ऊर्जामंत्री आणि अधिकारी यांना पांडुरंगाने सद्बुद्धी द्यावी असे साकडे घालून त्यांनी सकारात्मक निर्णय घेवून कंत्राटी कामगारांना सामावून त्यांना आरक्षण द्यावे जर तिन्ही कंपनी विषयी तोडगा निघाला नाही तर 7 जुलै पासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत असा इशारा या संघटनेने केले.

यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी एकादशी निमित्त शासनाच्या विरोधात वारकरी वेशात टाळ कुटून लक्षवेधी आंदोलन केले.

Leave a Reply