स्त्री शिक्षण प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतिंनिमित्त ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण.

स्त्री शिक्षण प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतिंनिमित्त ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण.

पुणे: भारतीय स्त्री शिक्षणाच्या आदय प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.सिल्व्हर रॉक्स या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या ट्रस्टी जेहलम जोशी,शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिति पदाधिकारी शिरीष फडतरे,लतिकाताई गो-हे,समुपदेशक स्त्री आधारकेंद्राचे शेलार गुरुजी,अनीता शिंदे,अनिता परदेशी,संजय व जयश्री शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ.नीलमताई गो-हे यांनी आज समाजात स्त्रियांना बरोबरीचे स्थान मिळत आहे यांच्या कर्तुत्वास मान्यत मिळत आहे याचे कारण म्हणजे सवित्रिबाई फुले यांनी केलेला त्याग व पुढाकार,त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली,तसेच सती प्रथेस विरोध केला.बलात्काराने जन्मलेल्या मुलींची हत्या होवूनये यासाठी बालहत्याप्रतिबंधक संस्थाची स्थापना केली.मात्र समाजात आजूनही महिलांवरील होणारे अत्याचार व शोषण पाहता.सावित्रीबाई फुलेंचे कार्य समाजाने पुन्हा सुरू केले पाहिजे असे संगितले.तसेच यावेळी महाराष्ट्रात कृतीदशक २०२० ते २०३०या निमित्ताने महिला प्रबोधन मंच याची स्थापना करीत असल्याची घोषणा केली.समाज व सरकार यांच्या सहकार्याने योजना व महिला विकास कार्यक्रम अंमलबजावणी करण्याचे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन केले.

छायाचित्र :पुष्पहार अर्पण प्रसंगी ना.डॉ.नीलम गो-हे व अन्य मान्यवर

Leave a Reply