डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार सातत्याने काम करणे हेच त्यांना खरे अभिवादन- ना.डॉ.नीलम गोऱ्हे

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार सातत्याने काम करणे हेच त्यांना खरे अभिवादन- ना.डॉ.नीलम गोऱ्हे

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार सातत्याने काम करणे हेच त्यांना खरे अभिवादन- ना.डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे दि.१४ : राज्यघटनेचे शिल्पकार आणि मानव अधिकारांचे थोर पूरस्करते करते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या आज अभिवादन करताना म्हणाला की, जवळजवळ पस्तीस चाळीस मी वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. समाजातल्या तळागाळातील समाजाला, त्याचबरोबर महिलांना, उपेक्षित घटकांना स्वतःचा आत्मविश्वास देण्याचे काम शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या भावनेतून या विचारातून या तत्व प्रणालीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हे सातत्याने मार्गदर्शन केले, स्वतः लढा दिला त्याच्या साठी प्रयत्न केले.

भारतीय राज्यघटना तयार करत असताना त्यांना खूप विरोध झाला. परंतु हिंदू कोड बिल हे देऊन याच्यामधून निताक्षरांनी रायभदा हे स्त्रियांच्या बद्दलचे जे कायद्यांचे भाग होते. त्याचा एक साहितीकरून त्याच्यात एक सुसूत्रता करण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याला काही संघजामी विचारांच्या लोकांचा विरोध होता. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारची राज्यघटना पाहिजे होती त्याच्या कुठलीही तडजोड केली नाही. त्यासोबत समाजामधील जो दुजाभाव आहे, त्याच्यामध्ये जातीयता हे एक फार मोठे संकट आहे. जातीचे उचटन, जातीचे निर्मूलन यांच्या निमित्ताने त्यांनी पुस्तके लिहिली अनेक पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. त्याच्यामध्ये उतरंडीची रचना असणारा समाज आहे जो समाज कुठेतरी दुजाभावाला कळत नकळत जात नाही ती जात म्हणुन समर्थन करत असतो. त्याच्या बद्दलचा मूलगामी विचार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी हजारो लाखो लोकांचे एक मोठे आंदोलन उभे केले की त्याची जगाच्या इतिहासामध्ये नोंद आहे असे ना.डॉ.गोऱ्हे सांगितले.

भारतामधल्या स्त्रियांसाठी हिंदू कोड बिलाच्या बरोबर मतदानाचा अधिकार मिळवून देण्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या संविधानानुसार आज चौदाव्या, पंधराव्या, सोळाव्या कलमानुसार सर्व समाजातील या घटकांना समान अधिकार मिळत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने विचार करायचा झाला तर मी सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समाजापुरते मर्यादित नाहीत तर ते सर्व समाजाचे नेते असे मानते. दुसरे समाजामध्ये जातीयतेच्या पलीकडे जाऊन समाजातल्या सर्व घटकांना एकत्र जोडणारा दुवा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. आज १४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या निमित्ताने आपण कधी घराघरात साजरी करत असतो. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक रीत्या आपल्या येथे साजरी करता येत नसली. तरीसुद्धा आपण आहोत त्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार सातत्याने काम करत राहणे हेच त्यांचे खरे अभिवादन आहे असे मला वाटते असे मत ना.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply