अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे;माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या मध्ये युवा मोर्चा च्या वतीने नागरिकांची मोफत जन धन खाते उघडण्याचा उपक्रम पुण्याचे खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक, शहराध्यक्ष जगदीश मुळीक ,मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या मार्गदर्शनात तसेच युवा अध्यक्ष अमित कंक, राजू परदेशी ,उमेश चव्हाण ,प्रणव गंजीवाले मनोज होनराव यांच्या नेतृत्वात घेण्यात आला
दुसरा कार्यक्रम महिला आघाडी च्या वतीने अटल बस सेवा या उपक्रमा अंतर्गत कार्यरत असलेल्या बस च्या वाहक आणि चालक यांचा सत्कार खासदार गिरीश बापट आमदार मुक्ता टिळक ,स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने,पुणे शहराच्या महिला अध्यक्षा अर्चना पाटील ,सरचिटणीस राजेश येनपुरे पी एम पी एल चे संचालक शंकर पवार मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष अश्विनी पांडे यांच्या उपस्थितीत पार पडला
तिसरा कार्यक्रम कसबा मतदारसंघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर नू म वी प्रशालेच्या मैदानावर घेण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात सुमारे ५५० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मतदारसंघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले

Leave a Reply