अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या ज्ञानश्री फाउंडेशन सन्मान

अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या ज्ञानश्री फाउंडेशन सन्मान

अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या ज्ञानश्री फाउंडेशन सन्मान

सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी अहोरात्र झटून कार्य करणाऱ्या तसेच अनाथ मुलांचे शिक्षण, आरोग्य व भवितव्य घडवण्यासाठी मोलाची कामगिरी केल्या बद्दल स्वर गंधा व ज्ञानश्री
फाउंडेशनचे जोहर भाई चुनावाला, अमर काळे व राजेंद्र दीक्षित यांना मराठवाड्यातील साथ फाउंडेशनने मानपत्र देवून प्रसंगी प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर,
यांच्या हस्ते सन्मानित केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

या प्रसंगी प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, यशवंत भुजबळ, राजेंद्र दीक्षित धनराज कदम विनिता देशमुख धनराज व मीराताई कदम असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

मीराताई धनराज कदम यांच्या साथ फाउंडेशन मराठवाडा व ज्ञानश्री
फाउंडेशन मोलाचे कार्य सध्या सुरू असून शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी ते काम करत आहेत.

या प्रसंगी बोलताना मीराताई म्हणाल्या की मी जिल्हा परिषदेला शिक्षिका म्हणून काम केले असून पोलिओनो वयाच्या 18 वर्षी दोन्ही पाय गेली अपंगावर मात करत जिद्दीने केला प्रवास केला आहे. माणूसकीच नातं जोपासण्यासाठी शेकऱ्याच मनोधैर्य वाढवण्यासाठी मी काम करते सध्या सेवासदन वसतिगृह हिंगोली येथे आई वडील छत्र हरवले आहे शा 40 मुले आहेत त्यांचा सांभाळ करते

यावेळी ज्ञानश्री
फाउंडेशन तर्फे संगीत रजनी कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.

Leave a Reply