‘ रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस चरित्र व कार्य’ ग्रंथाचे प्रकाशन

‘ रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस चरित्र व कार्य’ ग्रंथाचे प्रकाशन

‘ रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस चरित्र व कार्य’ या ग्रंथाचे प्रकाशन

पुणे: इतिहास संशोधक रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीसयांच्या १५० व्या जयंती निमित्त “रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस चरित्र व कार्य”या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे करण्यात आले त्या प्रसंगी डॉ.सुरेन्द्र पारसनीस अध्यक्ष रावबहादुर द.ब.पारसनीस स्मृती समिति,डॉ.सुधान्शु गोरे,विवेक कुलकर्णी,सुमती कुलकर्णी डॉ.रविंद्र पारसनीस,विपाशा पारसनीस,सुनीता पारसनीस आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ.सुरेन्द्र पारसनीस व डॉसुधान्शु गोरे यांनी रावबहादुर दत्तात्रेय बळवंत पारसनीस हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास संशोधक म्हणून ओळखले जातात. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र सर्व प्रथम त्यांनी प्रकाशित केले होते. त्यांनी केलेल्या कार्यास लोकमान्य टिळक यांचे प्रोत्साहन मिळाले होते.त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन केले.व अनेक पुस्तकेही प्रकाशित केली होती असे संगितले.

छायाचित्र :डावीकडून संदीप परसनीस,अशोक पारसनीस,रविंद्र पारसनीस,सुमती कुलकर्णी सुरेन्द्र पारसनीस,सुधान्शु गोरे

Leave a Reply