कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही ‘सीए’च्या परीक्षा सुरळीत ललित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही ‘सीए’च्या परीक्षा सुरळीत ललित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही ‘सीए’च्या परीक्षा सुरळीत ललित बजाज यांची पत्रकार परिषदेत माहिती; विद्यार्थी, सीए सभासदांचे उल्लेखनीय कार्य

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही योग्य नियोजन आणि नियमांचे काटेकोरपणे पालन यामुळे ‘सीए’च्या परीक्षा सुरळीतपणे सुरु आहेत. सोशल डिस्टंसिन्ग पाळले जावे, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या ५०० वरून ११०० वर नेण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही परीक्षा देणे सोयीचे होत आहे,” अशी माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए ललित बजाज यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आयसीएआय’चे उपक्रम, विविध बदल, विद्यार्थी व सीएंसाठी आणलेल्या तरतुदी याबाबत ललित बजाज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. प्रसंगी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए यशवंत कासार, ‘डब्ल्यूआयआरसी’चे सचिव सीए मुर्तुझा काचवला, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव सीए काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते.

ललित बजाज म्हणाले, “कोरोना काळात समाजाला मदतीचा हात देण्यासाठी सीए इन्स्टिट्यूटच्या सर्व सभासदांनी देशभर उल्लेखनीय कार्य केले. कोरोनाबाबत जागरूकता, गरजूना मदत असे अनेक उपक्रम राबवले. सीए परीक्षेबाबत विद्यार्थी, पालक चिंतीत होते. मात्र, इन्स्टिट्यूटमार्फत सर्व प्रकारची काळजी घेऊन सध्या परीक्षा सुरु आहेत. अभ्यासासाठीचे सर्व साहित्य ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या काळात नाविन्यपूर्ण बदल करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरु आहे.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “अभ्यासाचे साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासह वेबिनार्स, ऑनलाईन कार्यशाळा, तज्ज्ञांची व्याख्याने आयोजिली जाताहेत. सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यालाही सीए परीक्षा देता येईल, यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जात आहेत. विविध शिष्यवृत्ती योजना आणल्या जात आहेत. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘आयसीएआय’कडून विविध सूचना दिल्या जात आहेत. लघु व माध्यम उद्योगांना प्रोत्साहित केले जात आहे. सीए संदर्भातील कायद्यांमधील बदल विद्यार्थी व सीएपर्यंत पोहोचवले जात आहेत.”

सीए मुर्तुझा काचवाला म्हणाले, “कोरोनाच्या अवघड काळातही सनदी लेखापालांनी जीएसटी भरण्याचे काम व्यवस्थितपणे पार पाडले. ऑनलाईन प्रणालीला आत्मसात करत सीएनी केलेले काम उल्लेखनीय आहे. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सभासदांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासह ऑनलाईन व्याख्यानातून मार्गदर्शन होत आहे. ऑनलाईन फायलिंग करताना घ्यायची काळजीबद्दलही जागृती झाली आहे.” सीए यशवंत कासार यांनीही कोरोनामुळे सनदी लेखापाल क्षेत्रावर झालेल्या बदलांविषयी सांगितले. सीए अभिषेक धामणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए काशिनाथ पाठारे यांनी आभार मानले.

Leave a Reply