विद्यार्थ्यांनो बदलत्या परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सामर्थ्यशाली बना

विद्यार्थ्यांनो बदलत्या परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सामर्थ्यशाली बना

विद्यार्थ्यांनो बदलत्या परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सामर्थ्यशाली बना– प्रा. फुलचंद चाटे

चाटे शिक्षण समूह पुणे विभागातर्फे दहावी बोर्ड परीक्षेत सामोरे जाणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती पुणे याठिकाणी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे त्याच बरोबर फेसबुक लाईव्ह वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक फेसबुक लाईव्ह व झूम च्या माध्यमातून कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

आजच्या विविध क्षेत्रातील असणाऱ्या जीवघेण्या स्पर्धा पाहता विद्यार्थ्यांनी वेळेतच आपले ध्येय ठरवणे व त्यानुसार नियोजन बद्ध तयारी करून यश संपादन करणे हे आज फार आवश्यक झाले आहे दहावी बोर्ड परीक्षेस सामोरे जात असताना विद्यार्थ्यांनी योग्य ती उजळणी, वेळेचे नियोजन, पेपर प्रेझेंटेशन इत्यादी बाबींवर लक्ष देणे फार गरजेचे आहे त्याच बरोबर सध्याची कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता आपल्या आरोग्याची ही तितकीच काळजी घेणे आवश्यक बनले आहे आज महाराष्ट्रातून सोळा ते सतरा लाख विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी सामोरे जात असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे परीक्षेचे दडपण न घेता अतिशय आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेत सामोरे जावे असे आवाहन यावेळी चाटे शिक्षण समूह पुणे विभागीय संचालक प्रा फुलचंद चाटे यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रद्धा ओंबासे,ओंकार कळंबे त्याचबरोबर राहुल चाटे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेस शुभेच्छा देत असताना कोल्हापूर विभागीय संचालक प्रा भारत खराटे यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये असणाऱ्या विविध संधीबद्दल ओळख करून दिली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चाटे शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा गोपीचंद चाटे सर त्याच बरोबर चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागीय संचालक डॉ. प्रा भारत खराटे , प्रा समर जमादार, प्रा बापू काटकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना संबोधून बोलताना प्रा गोपीचंद चाटे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्मार्ट असावे, बदलत्या परिस्थितीनुसार येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सामर्थ्यशाली बनवावे . दहावी बोर्ड परीक्षा सोबतच अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षाचे महत्त्व अधोरेखित करत असताना विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावी या दोन वर्षांमध्ये मोबाईलच्या आहारी न जाता मोबाइलला स्वतःपासून जास्तीत जास्त दूर कसे ठेवता येईल व आपला अमूल्य असा वेळ स्वयंअध्ययन ना मध्ये कसा घालवता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे तरच आपण बोर्ड परीक्षा सोबतच पुढे असणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांमध्ये देखील उज्वल असे यश संपादन करू शकता. याकरिता चाटे शिक्षण समूहाच्या असणाऱ्या निवासी संकुलाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले आपल्या पुढील वाटचालीसाठी या कॉलेजची निवड करण्याचा सल्ला वेळी विद्यार्थी व पालकांना देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा समर जमादार यांनी केले व 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या भास्कराचार्य स्कॉलर सर्च परीक्षेस सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply