महामारीच्या काळात लोकहितार्थ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

महामारीच्या काळात लोकहितार्थ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

स्वामी ओमानंद भारती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोना महामारीच्या काळात लोकहितार्थ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला.

मुळशी 1जानेवारी 2021: सूर्यवाडी पौंड येथील आश्रमात
आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यरत असणारी ओम रेकी फॅमिली संस्थेचे स्वामी ओमानंद भारती यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या काळात लोकहितार्थ कार्य करणाऱ्या मान्यवर मोहम्मद शेख, सौ सुरेखा भालेराव, वामन कदम, वैशाली अवघडे, गणेश लांडगे ,संतोष बोतालजी, गणेश लाड, वंदना पवार, रामदास पवार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला…
ओम आनंद भारती हे ओम रेकी फॅमिली या संस्थेचे संस्थापक असून सध्या युरोप मधील फ्रान्स येथील आश्रमात ध्यानस्थ बसलेले आहेत
आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोरगरिबांना गरजू नागरिकांना अन्नदान वाटप करण्यात आले
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक चळवळीचे नेते मा. भगवानराव वैराट उपस्थित होते
या कार्यक्रमात श्री भगवानराव वैराट यांचा देखील संस्थेचे विश्वस्त कुलदीप तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात रेकी संस्थेच्या कार्याबद्दल अनुराग तिवारी, राहुल तिवारी, शिवम पांडे,
मोन्टू पांडे
आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाची सांगता ध्यान व योग करून करण्यात आली.

Leave a Reply