महामानवाच्या जयंतीनिमित्त भिम सेनेकडून अन्नदान व रक्तदान शिबिर आयोजन

महामानवाच्या जयंतीनिमित्त भिम सेनेकडून अन्नदान व रक्तदान शिबिर आयोजन

महामानवाच्या जयंतीनिमित्त भिम सेनेकडून अन्नदान व रक्तदान शिबिर आयोजन

पुणे,१४ एप्रिल: विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त युवा भिम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णाना रक्तपुरवठा कमी भासत आहे. राज्यातील या सर्व परिस्थितीची जान ठेवून भिम सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे यांच्या आदेशानुसार कात्रज माय माउली केअर सेंटर येथे हे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

युवा भिम सेना पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दणाने यांनी रक्तदान करून रक्तदानाचा कार्यक्रम सुरू झाला. या शिबिरात अनेक भीम सैनिकांनी व भीम प्रेमींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला व रक्तदान केले. सोबतच शंकर महाराज वसाहत धनकवडी पुणे येथे अन्नदान कार्यक्रम करण्यात आला; यावेळी विठ्ठल दादा वरूडे पाटील, युवा भिम सेना पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दनाने, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शुभम भाऊ धावरे, पुणे शहराध्यक्ष राहुल शिंदे, पुणे जिल्हा संघटक कन्हैया कोळगे, मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष भाऊ कांबळे, अमीर शेख तसेच श्रीमंत शिव शंभू मित्र मंडळ चे आधारस्तंभ कपिला अण्णा परदेशी, महेश भाऊ ढावरे, रोहित धावरे, अमोल ओहळ, नितीन भैय्या कदम, सुशांत भैय्या ढमढेरे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply