डॉ.दीपक तोष्णीवाल यांना आंतरराष्ट्रीय सूर्यगौरव पुरस्कार प्रदान.

डॉ.दीपक तोष्णीवाल यांना आंतरराष्ट्रीय सूर्यगौरव पुरस्कार प्रदान.

रोटरी क्लब फोर्च्युनचे संस्थापक अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोष्णीवाल यांना आंतरराष्ट्रीय “सूर्य गौरव पुरस्कार” सूर्यदत्तचे संचालक डॉ.संजय चोरडिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सूर्यदत्त संकुल बाणेर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या समारंभात कोवीड महामारीच्या काळात समाजसेवेचे कार्य करणार-या २१ मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.मानपत्र व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.डॉ.तोष्णीवाल यांनी बोलताना रोटरी फोर्च्युनच्या माध्यमातून रक्तदान शिबीर,अन्नदान व इतर उपक्रमातून मिळालेला हा सन्मान यात सहभागी लोकांना अर्पण केला.व सूर्यदत्त संस्थेचे आभार मानले. 

छायाचित्र :- डॉक्टर तोष्णीवाल,डॉ.चोरडिया व अन्य मान्यवर.

Leave a Reply