पुणे जिल्हा नियोजन समिती वार्षिक समितीची विधानभवन येथे बैठक संपन्न

पुणे जिल्हा नियोजन समिती वार्षिक समितीची विधानभवन येथे बैठक संपन्न

शाश्वत विकासाच्या १७ उद्दिष्टांबाबत कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यात निधी उपलब्ध करून त्याचे निधी खर्च करण्यात यावा- ना.डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्हा नियोजन समिती वार्षिक समितीची आज विधानभवन येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती. यावेळी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील विविध कामांचा विकास करत असताना जिल्ह्यातील पर्यावरण शाबूत राहिले पाहिजे यासाठी शाश्वत विकासाचे १७ उद्दिष्टांबाबत काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शाश्वत विकासाची उद्दिष्टे याबाबत निधी उपलब्ध करून जेंडर बजेटवर निधी खर्च करण्याची अपेक्षा डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना पालकमंत्री श्री पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.

बीडीपी आणि टेकड्यावर वाढलेले बांधकाम होत असल्याबाबत चर्चा करताना डॉ.गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा विचार करण्याची गरज डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली. मागील सरकारच्या कार्यकाळात महापालिका यांनी टेकडीवर बांधकाम करताना काही अटी शर्ती घालून वृक्ष लागवड झाल्यानंतर व मुळ जमीन मालकांना रेडी रेकनर प्रमाणे मोबदला देऊनच अत्यल्प बांधकामास मान्यता देण्याची विनंती केली असताना तात्काळ मुख्यमंत्री यांनी महापालिकेचा निर्णय स्थगिती निर्णय दिला होता असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टेकड्या वाचविण्यासाठी अनुकूल असून टेकड्यावर बांधकाम करणे चुकीचे असून टेकड्यावर सुरू असलेल्या बांधकामांना तात्काळ बंद करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकारी आणि बिल्डर वर कारवाई करण्याची मागणी डॉ.गोऱ्हे या बैठकीत केली.

सप्तश्रृंगी देवीच्या डोंगर धर्तीवर एकविरा देवी, शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला येथे रोपवे सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी मांडली. यावर पालकमंत्री श्री पवार यांनी असा निधी देणे उचित नाही परंतु पीपीपीत गुंतवणूक करणारी कोणती कंपनी किंवा खाजगी व्यक्ती असेल तर त्यांना रोपवे योजनेचे काम देऊ असे सांगितले.

याखेरीज स्वच्छता कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, मुलींना शिक्षण भत्त्यात वाढ, वाचनालयांना निधी, यावर उचित कार्यवाही करण्यासंदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी सुचना दिल्या.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खा.सुप्रिया सुळे, खा. श्रीरंग बारणे, खा.गिरीष बापट, खा.अमोल कोल्हे, आ.माधुरी मिसाळ यांच्या सह आमदार, महापौर, जिल्हापरिषद अध्यक्ष, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Leave a Reply