भारतीय गणिती वारसा पुढे आणण्यासाठी ‘अंकनाद’ चा उपक्रम

भारतीय गणिती वारसा पुढे आणण्यासाठी ‘अंकनाद’ चा उपक्रम

“थोर गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘लिलावती’ ग्रंथावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद 

पुणे: ‘अंकनाद’ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप तर्फे थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘लिलावती’ या ग्रंथावर आयोजित वेबिनारला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला .

या विषयावरील मासिक वेबीनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.१० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांचे या महिन्यातील पहिले सत्र पार पडले.११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पुढील सत्र होणार आहे.वर्षभर हा उपक्रम दुसऱ्या शनीवारी, दुसऱ्या रविवारी चालणार आहे.१० एप्रिल रोजी’ भास्कराचार्यांची लीलावती :कोष्टक आणि परिभाषा’ या विषयी भास्कराचार्य यांचे विचार शनिवारी सांगितले गेले.११ एप्रिल रोजी रविवारी ‘बेरीज आणि वजाबाकी’ विषयक गोष्टी सांगितल्या जाणार आहेत.

डॉ सुधाकर आगरकर म्हणाले,’जुन्या काळात मोजमापासाठी वेगळी परिभाषा,परिमाणे वापरली जायची.कवड्या,दमडी,पावल्या अशी नाणी चलनात होती.दागिन्यांच्या मोजमापासाठी यव,गुंज,धरण,घटक,मासा,तोळा ही परिमाणे वापरली जायची.लांबी मापनासाठी यव,अंगुळ,हात,कोस अशी मापने अभ्यासली पाहिजेत कारण भारतीय गणिती संस्कृतीचा हा इतिहास आहे .

भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने,आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून ‘अंकनाद’ अॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्स्चे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली.कोणाच्याही आयुष्यातून गणित बाजूला करता येत नाही म्हणून गणिताशी मैत्री केली पाहिजे,असे ते म्हणाले. प्राची साठे यांनी प्रास्ताविक केले.मंदार नामजोशी ,निर्मिती नामजोशी,समीर बापट यांच्यासह विद्यार्थी,संशोधक,पालक सह्भागी झाले.

आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने उलगडला गेला.

आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला

 

Leave a Reply