भगवान पार्श्वनाथ जन्मकल्याणक निमित्त जन्माभिषेक सोहळा

भगवान पार्श्वनाथ जन्मकल्याणक निमित्त जन्माभिषेक सोहळा

पुणे: पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त तीन दिवसीय जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे ७/८/९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. आज आचार्य भगवंत जगतचन्द्र सूरीश्वरजी यांच्या उपस्थितीत पार्श्वनाथ भगवान यांच्या मूर्तीवर विशीष्ट वनओषधी मिश्रित दूध व पाणी यांनी अभिषेक करण्यात आला. या प्रसंगी अनेक साधकांनी आठ्ठम उपवास(तीन दिवसीय उपवास) केले आहेत. या प्रसंगी लाभार्थी अ.सौ.प्रमिलाबेन सुमतीलाल वखरचंद शहा,सुधीरभाई शहा,अशोकभाई शहा,चिराग दोशी,धिरूभाई शहा,राजीव शहा,चंपकभाई शहा,आदि मान्यवर उपस्थित होते.मूर्तीस अंगी तसेच मंदिरास सजावट करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जैन अॅलर्ट ग्रुपने केले. जगभरातील लाखो जैन अनुयायी हे आठ्ठम उपवास(तीन दिवसीय) करतात. असे ट्रस्टी राजीव शहा यांनी नमूद केले.

छायाचित्र :अभिषेक करताना भाविक

Leave a Reply