आनंदमयी गुढीपाडवा साजरा करूया… सहा वर्षाच्या कार्तिक ने केले अवाहन

आनंदमयी गुढीपाडवा साजरा करूया… सहा वर्षाच्या कार्तिक ने केले अवाहन

आनंदमयी गुढीपाडवा साजरा करूया….. पुण्यातील सहा वर्षाच्या कार्तिक ने केली कोरोना काळात समाज प्रबोधन करणारी कविता

पुणे: महाराष्ट्र राज्य तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या 13 एप्रिल रोजी गुढीपाडवा हा हिंदू धर्मीय नवीन वर्षाचा सण साजरा होत आहे. मागील वर्षीही कोरोना काळातच आपण सर्वांनी गुढीपाडवा सण साजरा केला होता. व याहीवर्षी या अत्यंत संकटमय काळात आपल्याला गुढीपाडवा साजरा करावा लागत आहे. जर आपल्याला पुढच्या वर्षी आरोग्यदायी वातावरणात व आनंदमयी वातावरणात गुढीपाडवा साजरा करायचा असेल तर आपण आपली स्वतःची योग्य ती काळजी घेत शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. हाच मोठा संदेश आपल्याला दिला आहे पुण्यामधील एका लहानग्या सहा वर्षाच्या कार्तिक या मुलाने. या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कार्तिक ने एक सामाजिक संदेश देणारी कविता, आरोग्यमय संदेश देणारी एक कविता, येणारा काळ हा आनंदमय असायला हवा अशी उमेद देणारी कविता कार्तिक ने केली आहे.

 

नूतन वर्षाचे स्वागत करूया…

कोरोना रुपी राक्षस आसन हद्दपार करण्यासाठी नियमांची सुरक्षिततेची कास धरत

आरोग्य, सुरक्षित, मंगलमय गुढी उभारूया…

मास्क वापरून,सॅनिटायझर वापरून, गर्दी टाळून

कोरोनाला हद्दपार करूया

या नवीन महाराष्ट्राची संस्कृतीचा अभिमान आरोग्याची गुढी उभारूया…

गुढी पाडवा…कोरोनाला पाडूया आडवा

गर्दी टाळा, मास्क वापरा

आव्हान… आव्हान…आव्हान

सुरक्षित अंतर

आरोग्याच्या नंतर

कोरोना ला पळवून लावूया… छूमंतर आरोग्याची गुढी उभारूयात…

 

गुढी पाडवा… कोरोना करूया आडवा

नूतन वर्षाचे स्वागत

कोरोनाला हद्दपार करत

आरोग्याची कास धरत

गुढी उभारूया घरा…घरात

सर्वांना हात जोडून विनंती

मास्क वापरा,

सॅनिटायझर वापरा,

गर्दी टाळा

कोरोनाचा नायनाट करत

आरोग्याची गुढी उभारा

मास्क चा गडवा

आरोग्याची काढी

कोरोनाला दूर करून

बांधूयात आनंदाच्या गुढी

पुण्यामधील रहिवासी असलेला सहा वर्षे वयाचा कार्तिक हा धनंजय खलाने व ऍड. मोनिका खलाने यांचा मुलगा असून तो डेक्कन एज्युकेशन सोसायटी या शाळेचा विद्यार्थी आहे. त्याने एवढ्या लहान वयात केलेली ही समाज प्रबोधन करणारी कविता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याची सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply