देशातील सर्वात मोठे हिलिंग सेंटरला व्यास्तविक रूप

देशातील सर्वात मोठे हिलिंग सेंटरला व्यास्तविक रूप

पुणे: आत्महत्या मुक्त भारत, या मोहिम वर अहो रात्र काम करणारे डॉक्टर सत्येंद्र शुक्ला व त्यांचे लामा फेरा इंटरनॅशनल हिलिंग व ट्रेनिंग सेंटर आता देशातील सर्वात मोठे हिलिंग सेंटर व्यास्तव्यात आणले आहे. समाजातील आत्महत्येच्या गंभीर समस्येला नाश करण्यासाठी स्वतःचे घर विकून, मुलांची एफ.डी तोडून या कामासाठी डॉक्टर सत्येंद्र शुक्ला यांनी पैसा उभा केला व आता सेंटरचे काम पुर्ण केले आहे.

आज सेंटरच्या या मोनेसट्री ला भेट देण्यासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी, परीसरातील स्थानिक नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट, माजी नगरसेविका आरती बाबर, मनसे कार्यकर्त्ये रोहन गायकवाड तसेच इतर अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवि व डॉक्टर शुल्का यांच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

दिवसेंदिवस मानसिक तनाव, डिप्रेशन सारख्या समस्या वाढत असल्याने जीवन जगण्याची निराशा मनुष्याच्या मनात निर्माण होतात आणि तो आत्महत्येचा शिकार बनतो. आजतागायत हजारो लोकांचे प्राण वाचविण्यात यश संपादन केलेले डॉक्टर शुक्ला यांनी भारताला आत्महत्येपासून मुक्त करण्याची मोहीम हाती घेऊन त्या वर अहोरात्र काम करत आहेत. या सेंटर मध्ये प्रतिदिवस शंभराहून अधिक लोकांना ट्रीटमेंट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अडिच हजार वर्षांपूर्वीच्या लामा फेरा हिलिंग प्रक्रियेद्वारे व्यक्तीला पंच विकारापासून दुर करणे, मोफत ध्यान, योगा, नकारात्मक विचारापासून मुक्ती, समस्यांचा उपायवर मार्गदर्शन आदी अनेक गोष्टींवर मोफत काम केले जाणार आहे.

Leave a Reply