हर्षदा देशमुख-जाधव यांचा जिजाऊ जयंतीनिमित्त ‘राजमाता जिजाऊ स्त्रीशक्ती पुरस्कारा’ने गौरव

हर्षदा देशमुख-जाधव यांचा जिजाऊ जयंतीनिमित्त ‘राजमाता जिजाऊ स्त्रीशक्ती पुरस्कारा’ने गौरव

हर्षदा देशमुख-जाधव यांचा जिजाऊ जयंतीनिमित्त ‘राजमाता जिजाऊ स्त्रीशक्ती पुरस्कारा’ने गौरव

पुणे : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हर्षदा देशमुख-जाधव यांना ‘राजमाता जिजाऊ स्त्रीशक्ती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्टतर्फे लाल महालात आयोजित कार्यक्रमात ट्रस्टच्या कार्यकारणी सदस्य मीनाताई जाधव व उद्योजक समीरसिंह जाधवराव यांच्या हस्ते यांच्या हस्ते हर्षदा देशमुख-जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी हर्षदा यांच्यासह मान्यवरांनी जिजाऊंना अभिवादन केले.

याप्रसंगी बोलताना हर्षदा देशमुख म्हणाल्या, “शेकडो वर्षांपासून प्रगतीच्या आणि पुरोगामी विचारांच्या केंद्रबिंदु या महिलाच राहिल्या आहेत. महिलांनी अशाच पुढाकारातून काम केले, तर विविध क्षेत्रामध्ये त्या नवनवी यशशिखरे गाठू शकतात. बहुतेक क्षेत्रामध्ये आज यशस्वीरीत्या महिला काम करत आहेत. समाजातील विविध घटकांनी युवतींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले, त्यांचे कौतुक केले पाहिजे. युवतींच्या शिक्षणासाठी राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्टने काम करावे.”

समीरसिंह जाधवराव म्हणाले, “आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी, तसेच विद्यार्थानीच्या शिक्षणासाठी राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट कायमच प्रयत्न करत राहील. तसेच ट्रस्टतर्फे दर वर्षी १० गरजू विद्यार्थानीना शैक्षणिक मदत करण्याचे योजिले आहे.” प्रसंगी ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य दुष्यंत जाधव, अभयसिंह जाधवराव, विक्रमसिंह जाधव, अमित जाधव, दिग्विजय जाधवराव, ऍड. विजयसिंहराजे जाधव तसेच उद्योजक महेश बराटे, राजाभाऊ माने सरकार, अविनाश पाबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply