इंटरनॅशनल युथ आयकॉन 2021 या पुरस्कारांने अड. डॉ. रमेश खेमु राठोड यांचा सन्मान

इंटरनॅशनल युथ आयकॉन 2021 या पुरस्कारांने अड. डॉ. रमेश खेमु राठोड यांचा सन्मान

अॅड. डॉ. रमेश खेमू राठोड डी. लिट ही सर्वोच्च मानद पदवी प्रदान

पुणे : जेपीआर हारवर्ड-अमेरिका मानांकित सेंट मदर टेरेसा विध्यापिठा कडून डि. लिट (D. Litt) हि सर्वोच्च मानद पदवी तसेच इंटरनॅशनल युथ आयकॉन 2021 या पुरस्कारांने दिनांक 24 /01/2021 रोजी बंगलोर-कर्नाटक येथे अॅड. डॉ. रमेश खेमू राठोड यांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी संबधित विद्यापीठचे उपकुलगुरु विदया मॅडम, कर्नाटक जैन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू राज सिंग, मिस इंडिया 2017 ची तृप्ती राव, शास्त्रज्ञ डॉ. प्रभाकर, अभिनेता रंगनाथन, लीड इंडियाचे हरी कृष्णा मारम, रॉबर्ट डोनाल्ड, एआरकेचे मालक मा. जार्ज, डॉ. हेमंतकुमार गुलाटी, डॉ. खिजर अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.

अडवोकेट डॉ. रमेश खेमु राठोड हे पेशाने वकील असून त्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी असतात. कोरोना काळातील त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जा च्या बारा संघटना व संस्थेवर दूतावास म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे दहा मानद डॉक्टरेट या सर्वोच्च पदवीने गौरविण्यात आले. तसेच सातशे पेक्षा जास्त सामजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply