रांगोळीतून महात्मा बळीराजा यांना अभिवादन.

रांगोळीतून महात्मा बळीराजा यांना अभिवादन.

रांगोळीतून महात्मा बळीराजा यांना अभिवादन.

सिन्नर(नाशिक)- ­बलिप्रतिपदा दिनाचे औचित्य साधून कलेचं शिक्षण घेतअसलेल्या हर्षाली संजय शिंदे, सिन्नर (नाशिक)हिने बळीराजाप्रती कृतज्ञता व आदरभाव व्यक्त करण्यासाठी” काळ्या मातीतून सुगीचा दिवा उजळू दे..ईङापिङा टळूदे आणि बळीचं.राज्य येऊदे.असा बळीराजाच्या आर्त हाकेचा संदेश रांगोळीतून देण्याचा प्रयत्न केला..कृषीपूरक संस्कृतीत जन्मलेले वङील संजय शिंदे हे कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत व समतावादी, धर्मनिरपेक्ष आणि विवेकी विचारांनी प्रेरित असून त्यांचा प्रभाव कन्या हर्षालीवर पङला व त्या प्रेरणेने महापराक्रमी,सर्वगुणसंपन्न व समातावादी राजाचं दिवाळीत घराघरामधे पूजा व स्मरण व्हावं आणि मुळ सिंधू संस्कृती उजळावी या उद्देशाने कृषी संस्कृतीचं जतन व स्मरण व्हावे म्हणून शेतक-याची व्यथा रांगोळीतून साकारण्याचा मनोदय हर्षालीने केला.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते महामित्र .दत्ता वायचळे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली महात्मा बळीराजा व क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हर्षाली शिंदे व सौ.पुष्पा शिंदे यांनी औक्षण करून प्रतिमेचे पूजन केले. यावेळी नितिन शिंदे, साहिल शिंदे,स्तवन शिंदे,कु.सानिका शिंदे कु.अभिशा वायचळे उपस्थित होते.वास्तव वादी रांगोळी तुन बळीराजा ला सुगीचे दिवस येऊ दे हे रांगोळी कलेतून दाखविले म्हणून पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी फोन करून अभिनंदन केले तसेच सत्यशोधक प्रबोधन महासभेचे रांगोळी स्पर्धा आव्हानाला प्रतिसाद रांगोळी काढली म्हणून देखील आभार व्यक्त केले.

Leave a Reply