शिवप्रभु फांऊडेशनच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार वितरण सोहळा

शिवप्रभु फांऊडेशनच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार वितरण सोहळा

वनाझ ते रामवाडी नव्याने होणा-या मेट्रोला छत्रपती जिजाऊ माँसाहेबाचे नाव द्यावे – नगरसेवक दिपक मानकर

जुन्नर परिसरात शिवसंस्कार सृष्टी साकारणार – डॉ. अमोल कोल्हे_

पुणे: वनाझ ते रामवाडी या नव्याने होणा-या मेट्रोला छत्रपती जिजाऊ माँसाहेबाचे नाव दयावे अशी मागणी नगरसेवक दिपक मानकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे केली. पुण्यातील लाल महाल येथे छत्रपती जिजाऊ माँसाहेबांच्या 423 व्या जयंतीदिनानिमित्त शिवप्रभु फांऊडेशनच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे,नगरसेवक दिपक मानकर, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेविका स्मिताताई कोंढरे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, निवृत्ती बांदल, राज देशमुख, परागमामा मते उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणा-या मातांना गौरवण्यात आले. यामध्ये सुनंदाताई भागवत, अलका संभाजी बेलदरे, रेखाताई दिलीप ढमढेरे, सोनुबाई दत्तोबा माळवदकर, राधिका सुनिल देशमुख, भारतीताई प्रकाश कदम, आशाताई रतनशेठ बालवडकर, पार्वतीताई शंकर निवंगुणे, लिनाताई विद्याधर अनास्कर, शोभाताई रामदास माने, नंदाताई निवृत्ती बांदल, कमळाबाई महादु भोंडवे, शारदाबाई मोहनराव होले, सरलाताई सुरेश आगवणे, अंजनाताई हिरामन वाघोले, रुक्मिनीताई विठ्ठलराव तरडे, सुषमाताई संजय चोरडीया यांना जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिवप्रभू फाउंडेशन, जिजामाता तरुण मंडळ, लालमहाल महोत्सव समिती यांच्यावतीने शिवाजी हुलावळे, आप्पा भोसले, दिपक कापरे, प्रतिक हुलावळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

छत्रपती शिवाजी राजे ना जिजाऊ माँसाहेबांनी जे संस्कार दिले आणि या संस्कारातुन जे स्वराज्य घडविले अशा जिजाऊच्या विचारांचे संस्कार युवा पिढीवर व्हावेत याकरता जुन्नरच्या परिसरात शिवसंस्कार सृष्टी साकारली जाणार आहे. अशी माहिती शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. शिवाजी महाराजांवर जे संस्कार दिलेत ते संस्कार आजच्या पिढीवर झालेत तर आदर्श अशी पिढी तयार होऊन या देशाचे नाव उज्वल करतील. ज्यांनी स्वराज्याची शपथ घेऊन ते स्वराज्य मिळविले. शोषित, गरीबांवर होणारे अत्याचार महाराजांनी दुर केले. प्रसंगी शत्रुच्या पत्नीचाही आदर केला. अशा राजेना ज्यांनी संस्कार दिले अशा माँसाहेबाचे विचाराची सृष्टी शिवनेरीच्या परिसरात होणार आहे. त्याचा फायदा नक्कीच या पिढीला होईल असा विश्वास कोल्हे यांनी या वेळी व्यक्त केला.

Leave a Reply