कात्रज चौक ते नवलेपूल रस्त्या संबंधित ४ वर्षांपासूनच्या मागण्यांचे निवेदन पत्र

कात्रज चौक ते नवलेपूल रस्त्या संबंधित ४ वर्षांपासूनच्या मागण्यांचे निवेदन पत्र

कात्रज चौक ते नवलेपूल रस्त्या संबंधित ४ वर्षांपासूनच्या मागण्यांचे निवेदन पत्र या विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांची भेट त्यांच्या कार्यालयात घेतली, यावेळी सह अभियंता नाईक मॅडम उपस्थित होत्या.

       मागील ४ वर्षांपासून, मी खासदार सुप्रियाताई-सुळे यांच्या साथीने पाठपुरावा साधत आहे. यामध्ये पुढील भविष्याचा विचार करून संबंधित प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत. कोरोना – लोकडाऊन मुळे या विषयांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पुढील कार्यवाही तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. सदर मागण्या मान्य न केल्यास, पवित्रा बदलत स्थानिक नागरिकांच्या साथीने चक्का_जाम_आंदोलन करून सुरू असलेले काम बंद पाडू.

जर भविष्याचा विचार केला जात नसेल आणि भविष्यात पुढे जाऊन त्यांचा सामना करावा लागत असेल. तर आत्ता रस्ता करून उपयोग काय..?

दत्तनगर चौक येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरता राजमाता भुयारी मार्गास पर्यायी भुयारी मार्ग असणे गरजेचे आहे. यासाठी रुंदीकरणाचे काम सुरू होण्याअगोदर तत्कालीन अधिकाऱ्यांकडे भुयारी मार्ग सुचविण्यात आला होता. त्यांच्यातर्फे प्रस्तावित जागेचा सर्वे देखील करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी.

सर्विस रस्त्यांमधून दुतर्फा ड्रेनेज वाहिन्या, पावसाळी वाहिन्या, पाणी पुरवठा वाहिन्या टाकण्यात याव्यात.

पुणे मनपा विकास आराखड्यानुसार १८ मीटर रुंदीचे दोन डी. पी. रस्ते हायवेच्या मध्यातून जात असून, त्यांची कनेकटिव्हिटी साठी अंडरपास होणे गरजेचे आहे.

 

Leave a Reply