महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमीचे क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीच्या माध्यमातून पुण्यात आगमन
युवा क्रिकेटपटूंना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी अॅकॅडमी सज्ज
महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमीचे संचालक आणि दक्षिणआफ्रिकेचा माजी खेळाडू डेरिल कलीनन यांची घोषणा
पुणे : भारतीय क्रिकेटला वेगळ््या उंचीवर नेऊन ठेवणाºया महेंद्रसिंग धोनीच्या महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमीचे पुण्यात आगमन होत आहे. महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमी पुण्यातील अग्रगण्य क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीसोबत संलग्न झाली आहे. क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमी आणि महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमी एकत्रितपणे पुण्यातील युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झाले असून या अॅकॅडमीचे उद्घाटन जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, अशी माहिती महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमीचे संचालक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेरिल कलीनन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी रणजी खेळाडू बाबूराव यादव, ओनेल नोह, सोहेल रौफ, क्रिकेट मास्टर्स अॅकेडमीचे गजेंद्र पवार आणि अनिल वाल्हेकर, उमेश पाथरकर, अमोल माने उपस्थित होते.
डेरील कलीनन म्हणाले, सध्याच्या स्पर्धात्मक क्रिकेटयुगात पुण्यातील युवा क्रिकेटपटूंना जास्तीतजास्त आधुनिक पद्धतीचा सराव मिळावा आणि सोबतच क्रिकेटमधल्या नवनवीन पद्धतीचे सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावे म्हणून क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमी आणि एम.एस.धोनी क्रिकेट अॅकॅडमीच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
गजेंद्र पवार म्हणाले, क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीची स्थापना २०१३ मध्ये क्रिकेटचा सर्वांगीण विकास हा मुख्य दृष्टीकोन समोर ठेऊन झाली. ५ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी क्रिकेटचे प्रशिक्षण येथे मिळते. एम. एस. धोनी क्रिकेट अॅकॅडमीशी संलग्न झाल्याचा आम्हाला आनंद झाला आहे.
स्थानिक युवा गुणवान खेळाडूंना अत्युत्तम क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे, तांत्रिक आणि आधुनिक व्यायामाचे महत्व जाणून क्रिकेटमधला बदल स्थानिक खेळाडूंना अंगिकारता यावा म्हणून महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमीसोबत एकत्र येण्याच्या दृष्टीने क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीने एक अत्यंत महत्वाचे पाउल उचलले आहे.
एमएस धोनी क्रिकेट अॅकॅडमी (एमएसडीसीए) ही आरका स्पोर्ट्सची एक संस्था आहे. एम.एस.धोनी आणि मिहिर दिवाकर हे अॅकॅडमीचे भागीदार असून, भारत आणि परदेशात क्रिकेटच्या कोचिंग आणि विकासाच्या दर्जाचे पूर्णपणे रूपांतर केले जावे. सर्व आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज, उच्च श्रेणीचे कोचिंग सुविधा आणि प्रशिक्षक, एमएसडीसीए आपले पंख भारतासह परदेशात कानाकोपºयात पसरवित आहेत.
आरका स्पोर्ट्सची स्थापना २०१४ मध्ये करण्यात आली होती जी जगभरातील क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा सल्लागार सेवांवर केंद्रित संस्था आहे.
आरका स्पोर्ट्सची स्थापना मिहिर दिवाकर यांनी केली होती. ते स्वत: एक खेळाडू होते, जे भारत अंडर -१९ विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. त्यांना क्रीडा व क्रीडापटूंच्या गरजा स्पष्टपणे समजतात. आरका स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळाडूंमधील गुणांना प्रोत्साहन देत त्यांना उत्तम खेळाडू बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.