महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटी, पुणे आणि सेंटर फॉर अॅजडवानस्ड स्टडीज (कॅस)

महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटी, पुणे आणि सेंटर फॉर अॅजडवानस्ड स्टडीज (कॅस)

महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटी, पुणे आणि सेंटर फॉर अॅजडवानस्ड स्टडीज (कॅस)

पुणे: १६ डिसेंबर १९७१… तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील बांगला भाषक जनतेवर पश्चिम पाकिस्तानकडून सुरु असलेल्या अत्याचाराच्या विरोधात बांगला जनतेने ‘मुक्ती वाहीनी’च्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या लढ्याला यश येत जगाच्या नकाशात बांग्लादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. बंगाली लोकांच्या बांग्लादेश निर्मितीच्या प्रसव कळा भारतानेही सोसल्या. भारतीय लष्कराने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवत लष्करी वर्चस्व सिध्द केले. या विजयाची स्मृती ‘विजय दिवस’ म्हणून साजरी केली जाते. यंदा या दैदिप्यमान विजयाचे ५० वे वर्ष. त्यानिमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे आणि सेंटर फॉर अॅयडवानस्ड स्टडीज (कॅस) यांच्या संयुक्त विद्यमाने हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी वर्षभर भारताने मिळविलेल्या विजयांबद्दल व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान शुक्रवार दि. १५ जानेवारी २०२१ रोजी ‘लष्कर दिनाच्या’ निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि ‘कॅस’चे संचालक एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी दिली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुध्दे या वेळी उपस्थित होते.

बांग्लादेश मुक्तीचे हे युध्द केवळ भारतीय उपखंडासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठीची एक मैलाचा दगड आहे. केवळ १३ दिवसात भारतीय सैन्यांने आपले असिम शौर्य दाखवत ‘मुक्ती वाहिनी’ला मदत केली होती. धार्मिक आधावर ‘व्दिराष्ट्र’ सिध्दांताच्या आधारावर वेगळा झालेला पाकिस्तान, आपल्याच पूर्व पाकिस्तानील बंगाली नागरिकांवर अमानुष अत्याचार करित होता. वास्तविक पहाता बंगाली लोकांचा जो काही नरसंहार आणि छळ पाकिस्तान सैन्याने केला त्याचा खटला आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायालयात चालयला पाहिजे होता. परंतु त्यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानच्या या नरसंहाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भारतात पूर्व पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे येऊ लागले आणि त्याचा ताण भारतीय अर्थव्यवस्थेवर येऊ लागला होता. त्यामुळे भारताला बांग्लादेश मुक्ती युध्दात अपरिहार्यतेने उतरावे लागले. भारतीय सैन्य दलाने अवघ्या १३ दिवसात पाकिस्तानला घुडघ्यावर आणत १६ डिसेंबर १९७१ ला लेफ्टनंट जनरल ए.ए.के. नियाझी आणि त्यांच्या ९३,००० सैनिकांना शरणागती घ्यायला भाग पाडले. दुसर्या महायुध्दानंतची ही सर्वात मोठी सैन्य शरणागती होती जी भारताने पाकिस्तानला नमवत घ्यायला भाग पाडले. हे ९३,००० युध्दबंधी भारताने आपल्या विविध सैन्य छावण्यांमध्ये ठेऊन त्यांचे सुमारे दिड वर्षे म्हणजे जुलै १९७२ पर्यंत ‘सिमला करार’ होईपर्यंत पोषण केले.

भारतीय सशस्त्र दलांना तत्कालीन नेतृत्व पंतप्रधान इंदिरा गांधी, राजकारणी, नोकरशहा, मुत्सदी आणि भारतीय जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. यामुळेच १६ डिसेंबर २०२० रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या निर्णायक विजयाच्या निमित्ताने ‘स्वर्णिम विजय वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. १९७१ च्या या ऐतिहासिक युध्दाच्या सुवर्ण वर्षेपूर्ती निमित्ताने आम्ही सेंटर फॉर अॅहडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सयुक्त विद्यमाने विविध युध्दात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या सशस्त्र सैन्यातील दिग्गजांच्या व्याख्यानांचे वर्षभर आयोजन करण्याचे नियोजन केले आहे. नव्या पिढीला व विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दल यांचे शौर्य त्याचबरोबर इतर सर्व सरकारी संस्थांमधील नियोजन, नेतृत्व व समंन्वयाची माहिती व्हावी हा स्वच्छ, प्रामाणिक हेतू ही व्याख्यानमला आयोजित करण्यामागे आहे, असे एअरमार्शल गोखले म्हणाले.

Leave a Reply