महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावे- भगवानराव वैराट

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावे- भगवानराव वैराट

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावे- भगवानराव वैराट

पुणे . येथे गंज पेठ मधील महात्मा फुले च्या वाड्यामध्ये आज झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यात पुष्पहार झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भगवानराव वैराट म्हणाले की, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी भारतात पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या शिक्षिका म्हणून आणि त्यांना पती या नात्याने परिवर्तनाची चळवळ म्हणून महात्मा फुलेंनी दिलेली साथ ही अतिशय महत्त्वाची आहे ,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी हे मानव जातीसाठी केलेले कार्य हे देखील देशभक्ती चा भाग आहे. अनेक चळवळींच्या मार्फत आंदोलने छेडली जातात, परंतु राज्यकर्त्यांकडून आश्वासनाच्या पलीकडे काहीच होत नाही. ही पुण्यासारख्या शहरांमध्ये भिडे वाडा हा देखील गंभीर प्रश्न प्रलंबित असून पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने तात्काळ राज्यकर्त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना भारतरत्न देऊन भिडे वाड्याला देखील राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी आमच्या झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने करीत आहोत. याप्रसंगी पुणे शहराच्या महिला अध्यक्ष सौ सुरेखा भालेराव, वंदना पवार , श्रद्धा दिघे ,महंमद शेख ,प्रदीप पवार, गणेश लांडगे, सूर्यकांत सपकाळ ,अर्चना वाघमारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply