राधिका सुधीर बनल्या मिसेस महाराष्ट्र २०२० क्लासिक मृणाल कदम बनल्या मिसेस महाराष्ट्र

राधिका सुधीर बनल्या मिसेस महाराष्ट्र २०२० क्लासिक मृणाल कदम बनल्या मिसेस महाराष्ट्र

राधिका सुधीर बनल्या मिसेस महाराष्ट्र २०२० क्लासिक
मृणाल कदम बनल्या मिसेस महाराष्ट्र
पुणे, शनिवार २ जानेवारी २०२१:  जॅझमटाझ वर्ल्ड इव्हेंट्सने २०२१ ची सुरवात मिसेस महाराष्ट्र २०२० च्या घोषणेने केली. ज्याचे आयोजन या क्षेत्रातील अनुभवी व विख्यात साजिद शेख यांनी केले होते.
जाझमॅटाझ् वर्ल्ड इव्हेंट्स तर्फे आयोजित केल्या जाणार्या मिसेस महाराष्ट्र स्पर्धेने यंदा आपल्या ५ व्या हंगामात प्रवेश केला आणि संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेल्या स्पर्धकांमधुन झालेल्या अत्यंत कठिन निवड प्रक्रियेनंतर नुकताच पुण्यातील हॉटेल प्राइड येथे ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता.
आयोजित करण्यात आलेल्या या भव्य स्पर्धेमध्ये सहभागी सुंदर स्पर्धकांमधुन अनुभवी परिक्षकांनी सर्व निवड निकषाचा विचार करुन विजेत्या नावाची घोषणा केली . मिसेस महाराष्ट्र २०२० क्लासिक हे अत्यंत प्रतिष्ठित विजेतेपद राधिका सुधीरने यांनी जिंकले, मिसेस महाराष्ट्र हा सन्माननिय किताब मृणाल कदम यांनी जिंकला.
अन्य विजेता : · प्रथम रनर अप – निकिता कल्याणकर · द्वितीय रनर अप – योगिता रोहकले-भोसेकर · मिसेस परफ्टेक्ट – पूजा अटवाडकर · मिसेस टॅलेंटेड – स्वरांजलि माने · मिसेस ऑस्सम- केतकी संत
 या स्पर्धेसाठी पॅनलिस्ट म्हणुन मंजुषा मुलिक, (पुर्व विजेता, इंडिया इंटरनेशनल – क्लासिक विनर, क्वीन ऑफ क्वीन्स आणि मिसेस महाराष्ट्र विजेता) ,बॉबी कर्णी ( प्रसिद्ध डिझायनर ) आणि मिसेस योगिता गोसावी दरबास्तवार, मिसेस महाराष्ट्र उपस्थित होत्या.
 मिसेस महाराष्ट्राच्या ५ व्या सीझनचे आयोजन करणार्या जॅझमटाझ वर्ल्ड इव्हेंट्सन आपली २८ वर्षे पूर्ण केली आहेत. या स्पर्धेचे कोरिओग्राफ होते सॅम चर्चिल. व्हीएलसीसी ने उपस्थित महिलांना भव्य आणि उत्कृष्ट पद्धत्तीने तयार केले. लाँगिनस फर्नांडिसने आपल्या व्यावसायिक छायाचित्रणातून अद्भुत कार्य केले आणि सुंदर पोशाख वस्रम ने डिझाइन केले.
यावेळी परिचय समूहाने विशेष अभिनय सादर केला. आयोजन आणि डाईरेक्शन साज जाझचे होते.

Leave a Reply